World Cup Semi-Final 
क्रीडा

World Cup 2023: सहा सामने जिंकूनही भारत सेमीफायनलपासून अद्यापही लांब, नेमकं कारण काय? जाणून घ्या

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी अजूनही अधिकृतरित्या सर्व 10 संघ शर्यतीत आहेत.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 Semi-Final Qualification Scenario:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता हळुहळू अंतिम टप्प्याकडे वळत आहे, त्यामुळे रोमांच वाढत चालला आहे. आता या स्पर्धेतील उपांत्य फेरीत कोणते 4 संघ प्रवेश करणार, यासाठी चूरस वाढली आहे. दरम्यान, कोणासाठी कसे समीकरण आहे, याचा थोडक्यात आढावा घेऊ.

सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्व सहभागी 10 संघांचे प्रत्येकी 6 सामने खेळून झाले आहेत. यामध्ये भारताने सहापैकी सहा सामने जिंकले असून 12 गुणांसह अव्वल स्थान राखले आहे. त्यापाठोपाठ 5 विजयासह 10 गुण मिळवत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच प्रत्येकी 4 विजयांसह 8 गुण मिळवत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.

अफगाणिस्तान 3 विजयांसह पाचव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि नेदरलँड्स प्रत्येकी 2 विजयांसह 4 गुण मिळवत अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. तसेच 9 व्या आणि 10 व्या क्रमांकावर अनुक्रमे बांगलादेश आणि इंग्लंड असून त्यांनी आत्तापर्यंत एकच सामना जिंकला आहे.

दरम्यान, उपांत्य फेरीत अव्वल चार संघांनाच संधी मिळणार असली, तरी अद्यापही सर्व संघ यासाठी शर्यतीत कायम आहेत. तसेच भारताने सहापैकी सहा सामने जिंकले असले तरी अद्याप भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झालेले नाही. कारण सध्या भारताने १२ गुण आहेत आणि अजूनही अन्य 4 संघ आहेत, जे 12 गुणांपर्यंत पोहचू शकतात.

त्यामुळे भारताला उपांत्य फेरीतील स्थान पक्के करायचे असेल, तर त्यांना आणखी एक विजय गरजेचा आहे. जर भारताने आणखी एक जरी विजय मिळवला, तर भारतीय संघ अधिकृरित्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

कारण एका विजयानेही भारताचे 14 गुण होणार आहेत आणि सध्याच्या गुणतालिकेनुसार १४ गुण मिळवण्याची संधी आता फक्त दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला आहे. त्याचमुळे भारताचे स्थान निश्चित होईल.

तसेच दक्षिण आफ्रिकेचेही उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के आहे, मात्र त्यांनाही हे स्थान अधिकृतरित्या पक्के करण्यासाठी 2 विजयांची गरज आहे. तसेच त्यांचे एका विजयानेही स्थान पक्के होऊ शकते, पण त्यांना मग अफगाणिस्तानने एकतरी सामना पराभूत व्हावा अशी इच्छा असेल.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने पुढचे त्यांचे सर्व सामने जिंकले, तर त्यांचेही उपांत्य फेरीतील स्थान सहज पक्के होईल. पण जर त्यांना एक किंवा दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला, तर त्यांना आशा करावी लागेल की अफगाणिस्तानने दोन आणि श्रीलंका, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांनी किमान 1 सामना पराभूत व्हावा.

जेणेकरून हे संघ त्यांच्याइतक्या गुणांपर्यंत पोहचू शकणार नाहीत. तसेच जर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला जर पुढील तीनही सामन्यात पराभव स्विकारावा लागला, तरी त्यांना उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

दरम्यान, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांसाठी जरी समीकरण सोपे असले, तरी बाकी संघांसाठी मात्र हे समीकरण फार कठीण आहे.

अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत जाण्यासाठी पुढील तीनही सामन्यात विजय मिळवावे लागणार आहेतच, पण याबरोबरच त्यांना आशा करावी लागेल की भारत आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचे पुढील सर्व सामने पराभूत व्हावे, तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने कमीत कमी तीन पैकी २ पराभव स्विकारावेत.

याशिवाय नेदरलँड्स, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनाही अजूनही उपांत्य फेरीची दारं उघडी आहेत, पण त्यांना त्यांचे पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तसे झाल्यास ते अजूनही जास्तीत जास्त 10 गुण मिळवू शकतात.

पण, याबरोबरच त्यांना आशा करावी लागेल की दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानने सर्व सामने पराभूत व्हावेत. त्याचबरोबर त्यांना मोठ्या फरकानेही विजय मिळवावे लागतील, जेणेकरून त्यांना नेट रनरेटच्या जोरावरही बाकी संघांना मागे टाकता येईल.

इंग्लंड आणि बांगलादेशसाठी सध्यातरी सर्वात कठीण आव्हान आहे. त्यांच्यासाठी अजून उपांत्य फेरीची दारं पूर्णपणे बंद झालेली नसली, तरी ती पूर्ण उघडीही नाहीत. कारण इंग्लंड आणि बांगलादेश उर्वरित तीनही सामने जिंकले, तर आता केवळ 8 गुणांपर्यंत पोहचू शकतात.

मात्र, सध्या पहिल्या चारही क्रमांकावर असलेल्या संघांनी 8 गुणांचा टप्पा आधीच गाठलेला आहे. अशात त्यांना जर अजूनही उपांत्य फेरी गाठायची असेल, तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने सर्व सामने मोठ्या फरकाने हरण्याची अपेक्षा करावी लागेल.

इतकेच नाही, तर अफगाणिस्तान, नेदरलँड्स, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनीही किमान दोन-दोन पराभव स्विकारावे अशी अपेक्षा करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT