Rohit Sharma - Kane Williamson 
क्रीडा

World Cup 2023: भारत-न्यूझीलंड सेमी-फायनलमध्ये पुन्हा आमने-सामने! कधी आणि कुठे पाहाणार मॅच?

India vs New Zealand Semi-Final: वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना बुधवारी रंगणार आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final, Live Streaming Details:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी (15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात उपांत्य सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या सामन्याचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघ वर्ल्डकप ट्रॉफीपासून आता अवघे 2 पावले दूर आहेत.

भारताचा या वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शानदार खेळ झाला आहे. भारताने साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. न्यूझीलंडबाबत सांगायचे झाले, तर न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने पराभूत झाले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात धरमशाला येथे साखळी सामना झाला होता, ज्यात भारताने बाजी मारली होती. दरम्यान, या दोन संघात सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा उपांत्य सामना होत आहे. यापूर्वी वर्ल्डकप 2019 मध्येही उपांत्य फेरीत हे दोन संघच आमने-सामने आले होते. त्यावेळी न्यूझीलंडने विजय मिळवला होता.

तसेच भारत आणि न्यूझीलंड या संघांनी वर्ल्डकप स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने सलग पाचव्यांदा, तर भारताने सलग चौथ्यांदा वनडे वर्ल्डकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही संघाच्या कामगिरीकडे यंदा लक्ष्य असणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्याचा तपशील

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

    • भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

  • किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना?

    • भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन कसे पाहाता येईल?

    • भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर दिसणार आहे. तसेच डिज्नी+हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही या सामन्याचे लाईव्ह मोफत प्रक्षेपण पाहाता येणार आहे.

यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा

  • न्यूझीलंड - केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊथी, विल यंग, काईल जेमिसन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT