India vs New Zealand 
क्रीडा

World Cup 2023: भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे संकट? काय आहेत धरमशालेतील हवामान अंदाज, वाचा

India vs New Zealand: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात धरमशाला येथे सामना होणार असून यावेळी हवामानाचे अंदाज काय आहेत, जाणून घ्या.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Weather Update:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होणार आहे.

यापूर्वी धरमशाला येथे झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्या सामन्यादरम्यान बराचवेळ पावसाचा अडथळा आला होता, त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड सामन्यावेळीही असा अडथळा येणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, AccuWeather च्या रिपोर्टनुसार रविवारी धरमशाला येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा सामन्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच रविवारी संपूर्ण दिवस वातावरण ढगाळ राहू शकते. त्याचबरोबर १८ डिग्री सेल्सियशच्या दरम्यान तापमान असू शकते, तर ५१ टक्क्यांपर्यंत आद्रता असू शकते.

भारत-न्यूझीलंड सामना अन् पाऊस

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की २०१९ वर्ल्डकप स्पर्धेवेळी देखील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

तसेच या दोन संघात २०१९ वर्ल्डकप वेळीच उपांत्य सामनाही झालेला, ज्यातही पावसाचा मोठा अडथळा आला होता. त्यावेळी राखीव दिवशी हा सामना पूर्ण करण्यात आला होता. त्या सामन्यात भारतीय संघ १८ धावांनी पराभूत झाला होता.

दोन्ही संघ अपराजित

दरम्यान, रविवारी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांपैकी कोणता संघ विजयाची लय कायम ठेवणार यावर देखील चाहत्यांचे लक्ष राहणार आहे. कारण या स्पर्धेत केवळ भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ अपराजित आहेत. त्यांनी आत्तापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाही.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • न्यूझीलंड - केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊथी, विल यंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT