Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NED मॅचमध्ये धावांचा पडणार पाऊस? कसे असेल बंगळुरूतील हवामान अ्न खेळपट्टी, घ्या जाणून

World Cup 2023: अपराजित भारताला रोखत शेवट गोड करण्याचे आव्हान नेदरलँड्ससमोर रविवारी असणार आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना रविवारी (12 नोव्हेंबर) खेळवला जाणार आहे. हा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

भारताने आत्तापर्यंत 8 पैकी 8 साखळी सामने खेळले असून उपांत्य फेरीत यापूर्वीच प्रवेश केला आहे, तर नेदरलँड्सने 8 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर 6 सामने पराभूत झाले आहेत. सध्या ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत.

दरम्यान, आता दोन्ही संघ रविवारी अखेरचा साखळी सामना खेळण्यासाठी सज्ज असतील. हा नेदरलँड्सचा स्पर्धेतील अखेरचा सामनाही आहे.

अशी असेल खेळपट्टी?

बंगळुरुतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी असते, हे यापूर्वी झालेल्या अनेक सामन्यांमधून दिसून आले आहे. या मैदानात मोठ्या धावसंख्येचे सामने झाले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकून दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा संघांचा कल असेल.

पण, असे असले तरी याआधी या मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात मोठ्या धावा झाल्या नव्हत्या. त्यामुळे भारत विरुद्ध नेदरलँड्स संघातील सामन्यात एखादी नवीन खेळपट्टीही पाहायला मिळू शकते, ज्यावर गोलंदाजांना अधिक मदत मिळेल.

कसे असेल हवामान?

बंगळुरुमध्ये गेल्या काही दिवसात पावसाचे वातावरण राहिले आहे. मात्र, रविवारी बंगळुरुत पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तसेच ढगाळ वातावरण असेल.

रविवारी दिवसा बंगळुरुतील तापमान 28 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहू शकते, तसेच रात्री 16 डिग्री आसपास तापमान असेल.

आमने-सामने कामगिरी

भारत आणि नेदरलँड्स या दोन संघात आत्तापर्यंत दोनच वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यात दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • नेदरलँड्स संघ - स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोलॉफ वॅन डर मर्वे, लोगन वॅन बीक, आर्यन दत्त, नोह क्रोएज, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजलब्रेच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT