Team India 
क्रीडा

World Cup 2023: लखनऊमध्ये चालणार फिरकीची जादू? भारत-इंग्लंड मॅचवेळी कसे असेल हवामान, जाणून घ्या

India vs England: भारत आणि इंग्लंड संघात रविवारी वर्ल्डकप 2023 चा सामना लखनऊला होणार आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs England, Lucknow Weather Update:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड या संघात सामना होणार आहे. हा सामना लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार असून दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा प्रत्येकी सहावा सामना असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून आपला विजयी रथ कायम दौडवण्याचा भारतीय संघाचा हेतू असेल, तर पुन्हा विजयी लयीत परतण्याकडे आणि आपले आव्हान कायम ठेवण्याचा मानस इंग्लंडचा असेल.

मात्र या सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येणार नाही ना, असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल.

दरम्यान, लखनऊमध्ये रविवारी पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे पावसाचा अडथळा या सामन्यात येण्याची शक्यता फारशी नाही. Accuweather.com च्या अहवालानुसार रविवारी लखनऊमधील हवामानात दिवसा साधारण 32 डिग्री सेल्सियस उष्णता असू शकते, तसेच रात्री 16 टक्के उष्णता असू शकते.

या सामन्यादरम्यान संध्याकाळी दव पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकून संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसेच वातावरण उष्ण असणार आहे, तसेच खेळपट्टीही कोरडी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लखनऊमधील खेळपट्टीवर काळ्या आणि लाल मातीचे मिश्रण असल्याने फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता आले.

लखनऊमधील सामने

या स्टेडियमवर आत्तापर्यंत 7 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील एकच सामन्यात भारतीय संघ खेळला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 ऑक्टोबर 2022 रोजी सामना खेळला होता, ज्यात भारताला 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

तसेच या मैदानावर झालेल्या 7 वनडे सामन्यांपैकी 4 सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, तर 3 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. इंग्लंड संघ अद्याप या मैदानावर वनडे सामना खेळलेला नाही.

असे आहेत भारत आणि इंग्लंडचे संघ

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • इंग्लंड - जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड विली, आदिल रशीद, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड, ब्रायडन कार्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT