KL Rahul
KL Rahul PTI
क्रीडा

'...लोक विसरू देत नाही', IND vs ENG सामन्यापूर्वी लखनऊमधील आठवणींनी KL राहुल भावूक

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs England, KL Rahul on Lucknow Memories:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना रविवारी (29 ऑक्टोबर) होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने या मैदानावर भाष्य केले आहे.

खरंतर केएल राहुल आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे लखनऊमधील एकाना स्टेडियम हे या संघाचे घरचे मैदान आहे. त्यामुळे यंदा देखील या संघाने आयपीएलमधील सामने या स्टेडियममध्ये खेळले. मात्र, केएल राहुल ज्यावेळी या मैदानावर यापूर्वी अखेरचा सामना खेळला, त्यावेळीची त्याची आठवण फारशी चांगली नव्हती.

तो आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध 1 मे रोजी या मैदानावर खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याला झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखावतीमुळे त्याला शस्त्रक्रियाही मांडीवर करून घ्यावी लागली, ज्यामुळे तो बरेच महिने क्रिकेटपासून दूर राहिला होता.

याच आठवणीबद्दल इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये शनिवारी केएल राहुल बोलत होता. त्याने म्हटले की 'मला विसरायचे आहे, पण लोक मला त्या गोष्टी विसरू देत नाहीत.'

तो पुढे म्हणाला, 'काल मी मैदानावर आलो, या मैदानावरील माझी शेवटची आठवण अशी की मी खाली पडलो आणि स्वत:ला दुखापत करून घेतली. आशा आहे की मी त्या गोष्टी मागे सोडेल आणि मी काही चांगल्या आणि आनंदी आठवणी बनवून झालेल्या गोष्टी विसरेल.'

'मला जी दुखापत झालेली, त्यामुळे मला खेळापासून चार-पाच महिने दूर राहावे लागले. तो खूप कठीण होता. ज्याला कोणाला दुखापत झाली असेल, त्याला विचारा. जेव्हा शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला पुनरागमन करायचे असते, तेव्हा खूप मेहनत घ्यावी लागते, संयम ठेवावा लागतो. तुम्हाला अशा गोष्टींमधून जावे लागते, ज्या सोप्या नसतात.'

दरम्यान, केएल राहुलने या दुखापतीनंतर शानदार पुनरागमन केले आहे. तो सध्या वर्ल्डकप 2023 मध्ये देखील चांगला खेळ करत असून तो 5 सामन्यांपैकी फक्त एकदाच बाद झाला आहे. त्याने 177 च्या सरासरीने 177 धावा केल्या आहेत. नाबाद 97 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT