Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh | Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: भारताविरुद्ध बांगलादेशने जिंकला टॉस! कॅप्टन संघातून बाहेर, पाहा दोन्ही टीमचे 'प्लेइंग-11'

IND vs BAN: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पुण्यात होणाऱ्या सामन्यात भारताविरुद्ध बांगलादेशने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Bangladesh, Playing XI:

गुरुवारी (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १७ वा सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बांगलादेशला या सामन्यापूर्वी धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला दुखापत असल्याने तो या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी नजमुल हुसैन शान्तो नेतृत्व करणार आहे.

तसेच बांगलादेशने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. शाकिब ऐवजी नसुम अहमदला संधी देण्यात आली आहे. तसेच तस्किन अहमद ऐवजी हसन मेहमुदला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

तसेच भारतीय संघाने मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध खेळलेला ११ जणांचा भारतीय संघच या सामन्यातही खेळताना दिसणार आहे.

दरम्यान भारताचा आणि बांगलादेशचा हा या स्पर्धेतील हा चौथा सामना आहे. दरम्यान या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजीत राहिला आहे, तर बांगलादेशने 3 पैकी एक सामना जिंकला आहे, तर 2 सामने पराभूत झाले आहेत.

त्यामुळे भारतीय संघ आपली विजयी लय कायम ठेवण्यासाठी, तर बांगलादेश पुन्हा विजयी पथावर परण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • बांगलादेश - लिटन दास, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT