India vs Australia BCCI
क्रीडा

World Cup 2023: कमिन्सने जिंकला टॉस, गिलच्या जागेवर इशानला संधी; पाहा भारत-ऑस्ट्रेलियाची 'प्लेइंग-11'

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी चेन्नईमध्ये वर्ल्डकप 2023 मधील आपला पहिला सामना खेळणार आहेत.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 India vs Australia Playing XI :

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाचवा सामना रविवारी (8 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळवला जाणार आहे. या सामन्याने हे दोन्ही संघ आपली मोहित सुरु करणार आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताने शुभमन गिलला विश्रांती दिली असून इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. गिला काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाल्याचे समजले होते. तो यातून अद्याप पूर्ण बरा झालेला नसल्याने त्याला विश्रांती दिली आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसला देखील छोटी दुखापत झाली असल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर सीन ऍबॉट आणि जोश इंग्लिस यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, ऍडम झम्पा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'व्होट चोरी'चा आरोप

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT