Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings 2023: केन विल्यमसनचा जलवा, जो रुटकडून हिरावला नंबर 1 चा मुकुट; स्टीव्ह स्मिथला मोठा फायदा

Manish Jadhav

ICC Test Rankings 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बऱ्याच कालावधीनंतर पुरुषांची कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे.

ताज्या क्रमवारीनुसार, न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने (Kane Williamson) इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू जो रुटला मागे टाकले आहे. तो नंबर 1 कसोटी फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथलाही मोठा फायदा झाला आहे.

लॉर्ड्स कसोटीनंतर ज्यो रुटला दुखापत झाली

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत इंग्लंडचा (England) अनुभवी फलंदाज जो रुटला सर्वाधिक फटका बसला आहे. लॉर्ड्स कसोटीत ज्याची कामगिरी काही खास नव्हती. रुट याआधी पहिल्या क्रमांकावर होता. मात्र आता तो थेट पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या गुणांमध्येही मोठी घट झाली आहे.

स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकाच्या जवळ पोहोचला आहे

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथ शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच्या कामगिरीचा फायदा त्याला क्रमवारीतही पाहायला मिळाला. स्मिथ यापूर्वी 861 गुणांसह पाचव्या क्रमांकावर होता.

पण त्याला लॉर्ड्सवरील शतकाचा फायदा झाला आहे. तो आता 882 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्मिथ अव्वल स्थानावर असलेल्या विल्यमसनपेक्षा केवळ 1 गुणांनी मागे आहे. जर त्याने हेडिंग्लेमध्ये चांगली कामगिरी केली तर तो नंबर 1 फलंदाज बनेल.

ICC पुरुषांची कसोटी क्रमवारी: अव्वल 5 फलंदाज

1. केन विल्यमसन (न्यूझीलंड)

2. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

3. मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया)

4. ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)

5. जो रुट (इंग्लंड)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

SCROLL FOR NEXT