ICC Test Ranking मध्येही कागांरुंचेच वर्चस्व! 1984 नंतर पहिल्यांदाच घडला 'असा' विक्रम

कसोटी चॅम्पियनशीप फायनलनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.
Travis Head | Steve Smith
Travis Head | Steve SmithDainik Gomantak
Published on
Updated on

ICC Test Ranking: इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर 7 ते 11 जूनदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर आता आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी घोषित केली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत फलंदाजीमध्ये पहिल्या तिन्ही क्रमांकावर तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कब्जा केला आहे. त्यामुळे एक विक्रमही झाला आहे. सध्या या क्रमवारी स्टीव्ह स्मिथने एका स्थानाची प्रगती करत 885 रेटिंग पाँइंटसह दुसरा क्रमांक मिळवला आहे.

तसेच ट्रेविस हेडने तीन स्थानांनी उडी घेत 884 रेटिंग पाँइंटसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. मार्नस लॅब्युशेन 903 रेटिंग गुणांसह अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्यामुळे एकाच संघाचे तीन फलंदाज एकाचवेळी क्रमवारीत पहिल्या तीन क्रमांकावर असण्याची ही डिसेंबर 1984 सालानंतरची पहिलीच वेळ आहे.

Travis Head | Steve Smith
ICC Men Player Of The Month: 'या' 23 वर्षीय स्टार फलंदाजाने बाबर आझमला मागे टाकत मिळवला ICC चा हा पुरस्कार!

यापूर्वी डिसेंबर 1984 साली वेस्ट इंडिजचे गोर्डन ग्रीनिज (810 पाँइंट्स), क्वाईव्ह लॉइड (787 पाँइंट्स) आणि लरी गोम्स (773 पाँइंट्स) हे तीन फलंदाज कसोटी क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर होते.

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात स्मिथने 121 आणि हेडने 163 धावांची शतकी खेळी केली होती. दरम्यान, फलंदाजी क्रमवारी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाही अव्वल 10 जणांमध्ये आहे. पण त्याची क्रमवारी 2 स्थानांनी घसरली असून तो आता 9 व्या क्रमांकावर आला आहे.

याशिवाय भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या सहा महिन्यापासून कार अपघातात झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असला, तरी पहिल्या 10 जणांमध्ये स्थान टिकवून आहे. तो 10 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या 10 जणांमध्ये तो एकमेव भारतीय आहे.

Travis Head | Steve Smith
WTC Final मध्ये रोहित शर्माने सुचवले 'हे' 3 मोठे बदल, ICC मान्य करेल का भारतीय कर्णधाराची मागणी?

त्यानंतर रोहित शर्मा 12 व्या आणि विराट कोहली 13 व्या क्रमांकावर आहे. तसेच अजिंक्य रहाणेने अंतिम सामन्यात 89 आणि 46 धावांची खेळी केली होती, ज्याचा त्याला फायदा झाला असून तो आता 37 व्या क्रमांकावर आला आहे.

तसेच पहिल्या डावात अर्धशतक करणारा शार्दुल ठाकूर फलंदाजी क्रमवारीत 94 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच शार्दुल यष्टीरक्षकांच्या क्रमवारीत 31 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

गोलंदाजी क्रमवारीत फिरकीपटू नॅथन लायनला फायदा झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. तो आता जसप्रीत बुमराहसह 8 व्या क्रमांकावर आला आहे. बुमराहच्या क्रमवारीत 2 स्थानांची घसरण झाली आहे.

दरम्यान, आर अश्विनला मात्र कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नसली, तरी त्याने गोलंदाजी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com