ICC Men's T20 World Cup2 026 Dainik Gomantak
क्रीडा

ICC Men's T20 World Cup2 026: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! अमेरिकेविरुद्धच्या सामन्यातून 'यॉर्कर किंग' बुमराह बाहेर?

T20 World Cup, 2026: टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आजपासून म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिकेविरुद्ध (USA) करणार आहे.

Sameer Amunekar

टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आजपासून म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिकेविरुद्ध (USA) करणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे असतानाच, भारतीय गोटातून एक अत्यंत चिंतेची बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. विश्वविजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरणाऱ्या 'सूर्या ब्रिगेड'साठी हा एक मोठा अनपेक्षित धक्का मानला जात आहे.

व्हायरल फिव्हरने वाढवली चिंता 

'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला तीव्र व्हायरल फिव्हर (विषाणूजन्य ताप) झाला आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी सरावासाठी बुमराह मैदानात आला खरा, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने गोलंदाजीचा सराव केला नाही.

स्पर्धेचे गांभीर्य आणि बुमराहची फिटनेस लक्षात घेता, व्यवस्थापन त्याला विश्रांती देण्याचा विचार करत आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत बुमराहची भूमिका निर्णायक असल्याने, सुरुवातीच्या सामन्यात त्याला खेळवून धोका पत्करण्याची संघ प्रशासनाची इच्छा नाही.

निवडीसाठी केवळ १३ खेळाडू उपलब्ध 

भारतीय संघापुढील अडचणी इथेच संपत नाहीत. १५ सदस्यांच्या मुख्य संघातून सध्या निवडीसाठी केवळ १३ खेळाडू फिट आहेत. जसप्रीत बुमराह आजारी असतानाच, अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.

सुंदर सध्या बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये रिकव्हरी करत असून त्याला अद्याप वैद्यकीय पथकाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. अशा परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षकांकडे प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी मर्यादित पर्याय उरले आहेत.

मोहम्मद सिराजवर जबाबदारी

हर्षित राणा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला होता. आता बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजला अंतिम अकरामध्ये संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

सिराजने अलीकडच्या काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असली, तरी बुमराहची जागा भरणे हे त्याच्यासाठी मोठे आव्हान असेल. अमेरिकेविरुद्धच्या या सलामीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व सिराज कसे करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT