Mohammad Shami BCCI
क्रीडा

ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी मोहम्मद शमीचे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आव्हान!

Mohammad Shami: दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह शमीला ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

Pranali Kodre

ICC Men’s Player of the Month nominees for November 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला पुरस्कार दिला जातो. आयसीसीकडून प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन-तीन खेळाडूंना नामांकन दिले जाते. त्यानंतर एका खेळाडूची विजेता म्हणून निवड करण्यात येते.

त्यानुसार गुरुवारी (७ डिसेंबर) आयसीसीने नोव्हेंबर महिन्यासाठी या नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

आयसीसीने नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन दिलेल्या पुरुष खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा समावेश आहे. या तिघांनीही नोव्हेंबर महिन्यात शानदार कामगिरी केली आहे.

हे तिघेही नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत खेळले. तसेच त्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या टी२० मालिकेत ट्रेविस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल खेळले.

ट्रेविस हेड

हेडने नोव्हेंबर महिन्यात वर्ल्डकप 2023 मधील 5 वनडे सामन्यांमध्ये खेळताना 44 च्या सरासरीने 220 धावा केल्या. यामध्ये त्याने उपांत्य सामना आणि अंतिम सामन्यात अनुक्रमे अर्धशतक आणि शतक केले होते.

तसेच तो या दोन्ही सामन्यात सामनावीरही ठरला होता. त्याच्या खेळामुळे त्याने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर त्याने टी20 मालिकेत 3 सामन्यांत 94 धावा केल्या.

ग्लेन मॅक्सवेल

ग्लेन मॅक्सवेलने नोव्हेंबर 2023 महिन्यात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 3 वनडेत 204 धावा केल्या. यातील दोन सामन्यात तो नाबाद राहिला. तसेच यात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या 201 धावांच्या नाबाद द्विशतकी खेळीचा समावेश आहे. तसेच त्याने 2 विकेट्स घेतल्या.

याशिवाय मॅक्सवेलने भारताविरुद्ध दोन टी20 सामने खेळताना 116 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 5 सामने खेळताना 15 विकेट्स घेतल्या. यामध्ये दोनदा त्याने एका सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे त्याने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात 57 धावांत 7 विकेट्स घेतल्या.

या महिला खेळाडूंना नामांकन

याशिवाय आयसीसीने नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन दिलेल्या पुरुष खेळाडूंमध्ये बांगलादेशच्या नाहिदा अख्तर आणि फरंगा होक यांच्यासह पाकिस्तानच्या सादिया इक्बालचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

SCROLL FOR NEXT