बुमराह, डीकॉकला पछाडत 23 वर्षीय क्रिकेटरची ICC च्या 'बेस्ट प्लेअर ऑफ द मंथ'वर छाप

ICC Player of the Month: आयसीसीने ऑक्टोबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे घोषित केली आहेत.
Quinton de Kock | Jasprit Bumrah | Rachin Ravindra
Quinton de Kock | Jasprit Bumrah | Rachin Ravindra

ICC announced Player of the Month for October 2023 Rachin Ravindra Hayley Matthews Winner:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला पुरस्कार दिला जातो. त्यानुसार शुक्रवारी (10 नोव्हेंबर) आयसीसीने ऑक्टोबर 2023 महिन्यातील विजेत्या खेळाडूंची नावे घोषित केली आहेत.

दरम्यान, आयसीसीकडून प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन-तीन खेळाडूंना नामांकन दिले जाते. त्यानंतर एका खेळाडूची विजेता म्हणून निवड करण्यात येते.

ऑक्टोबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार न्यूझीलंडचा 23 वर्षीय अष्टपैलू रचिन रविंद्रला मिळाला आहे.

त्याने याबाबत दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. डी कॉक आणि बुमराह या दोघांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

Quinton de Kock | Jasprit Bumrah | Rachin Ravindra
World Cup 2023: बंगळुरूत ट्रेंट बोल्टचा मोठा पराक्रम! मॅकग्रा-मुरलीधरनला टाकलं मागे

रचिनने ऑक्टोबरमध्य प्रभावित करणारी कामगिरी केली. त्याने ऑक्टोबरमध्ये 2 शतकांसह 81.20 च्या सरासरीने 406 धावा केल्या होत्या. याबरोबरच त्याने 3 विकेट्सही घेतल्या.

तसेच बुमराहने ऑक्टोबर महिन्यात वर्ल्डकप 2023 मध्ये खेळताना भारतासाठी 14 विकेट्स घेतल्या, तर डी कॉकने ऑक्टोबर महिन्यात तीन शतकांसह 431 धावा केल्या. तसेच त्याने यष्टीरक्षण करताना एक यष्टीचीत आणि 10 झेलही घेतले.

आयसीसीचा पुरस्कार जिंकल्यानंतर रचिन म्हणाला, 'मला हा पुरस्कार जिंकून खूप चांगलं वाटत आहे. माझ्यासाठी आणि संघासाठी हा महिना खूप खास राहिला आहे. भारतामध्ये वर्ल्डकप खेळणे खूपच मस्त आहे.'

Quinton de Kock | Jasprit Bumrah | Rachin Ravindra
Rachin Ravindra: 23 व्या वर्षीच रचिनने गाठली नवी उंची, सचिनला मागे टाकत रचला मोठा वर्ल्ड रेकॉर्ड

त्याचबरोबर रचिन म्हणाला, 'संघाकडून मिळालेल्या पाठिंब्याने खूप मदत झाली. मला माझा नैसर्गिक खेळ करण्यासाठी स्वातंत्र्य मिळाले. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती, माझ्या खेळाला मदत करणारी होती.'

हेली मॅथ्यूजला पुरस्कार

ऑक्टोबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजला मिळाला. तिने बांगलादेशची नाहीदा अख्तर आणि न्यूझीलंडच्या एमेलिया केरला मागे टाकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com