ICC Men's ODI Cricket World Cup 2023 All the squads:
भारतात 13 वा वनडे वर्ल्डकप खेळला जाणार आहे. जगातील दहा संघात यंदा वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने रंगणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
तब्बल 46 दिवस चालणाऱ्या या मुख्य स्पर्धेत 48 सामने होणार असून हे सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात मिळून होणार आहेत.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे 10 संघ खेळणार आहेत.
दरम्यान, या वर्ल्डकपसाठी सहभागी देशांना आपापल्या संघातील खेळाडूंची नावे आयसीसीकडे सुपूर्त करण्याची 28 सप्टेंबर ही अंतिम तारिख होती. त्यानुसार 28 सप्टेंबरला रात्री उशीरापर्यंत सर्व संघ निश्चित झाले. या वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या सर्व 10 संघांवर एक नजर टाकू.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
अफगाणिस्तान - हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
ऑस्ट्रेलिया - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
बांगलादेश - शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन मेहमूद , शरीफुल इस्लाम , तनझिम हसन साकीब.
इंग्लंड - जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
नेदरलँड्स - स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एजलब्रेच
न्यूझीलंड - केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊथी, विल यंग.
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्लाह शफिक, मोहम्मद रिझवान, सौद शकिल, इफ्तिखर अहमद, सलमान अली आघा, मोहम्मद नवाझ, उस्मान मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद वासिम.
दक्षिण आफ्रिका - तेंबा बाऊमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिक्स, मार्को यान्सिन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, ताब्राईज शम्सी, रस्सी वॅन दर द्युसेन, अँडी फुलेकवायो, लिझाड विलियम्स.
श्रीलंका - दसुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पाथम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महेश तिक्षणा, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, दुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, माथेराना हेमंत
राखीव- चमिका करुणारत्ने
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.