World Cup: अक्षर पटेल वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर, बदली खेळाडूची केली घोषणा!

World Cup 2023: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे.
Akshar Patel
Akshar PatelDainik Gomantak

World Cup 2023: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. आशिया कप 2023 दरम्यान अक्षर पटेलला दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप बरा होऊ शकला नाही.

अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला म्हणजेच बीसीसीआयला त्याच्या बदलीची घोषणा करावी लागली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने पुष्टी केली आहे की, अक्षर पटेल 2023 चा विश्वचषक खेळणार नाही. त्याच्या जागी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन संघाचा भाग असेल.

ICC ने आपल्या वेबसाईटवर माहिती दिली आहे की, ICC मेन्स क्रिकेट विश्वचषकासाठी भारताला (India) आपल्या 15 सदस्यीय संघात शेवटच्या क्षणी बदल करावा लागला आहे. आशिया कप 2023 दरम्यान अक्षरला पटेलला दुखापत झाली.

Akshar Patel
World Cup 2023: भारतात पोहचताच कसे झाले स्वागत? बाबर आझमसह पाकिस्तानी खेळाडूंनी अशी दिली रिॲक्शन

दरम्यान, अक्षर पटेलच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे, जो टीम इंडियाच्या सराव सामन्यासाठी गुवाहाटीला पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून त्याने टीम इंडियाच्या वनडे संघात पुनरागमन केले. त्याने दोन सामन्यांत चार विकेट घेतल्या.

अक्षरची त्याच्या फिटनेसच्या आधारावर अंतिम वनडे सामन्यासाठी संघात निवड करण्यात आली होती, परंतु तो तंदुरुस्त होऊ शकला नाही.

Akshar Patel
World Cup 2023 साठी भारत 'या' दोन संघाविरुद्ध करणार अंतिम तयारी, पाहा सराव सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com