Imran Khan  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्ड कप फायनलसाठी इम्रान खान यांना ICC चे निमंत्रण; तरीही पाहता येणार नाही सामना, जाणून घ्या कारण

World Cup 2023: भारतात खेळला जात असलेला एकदिवसीय विश्वचषक 2023 शेवटच्या टप्प्यात आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: भारतात खेळला जात असलेला एकदिवसीय विश्वचषक 2023 शेवटच्या टप्प्यात आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आता एक संघ पात्र ठरण्यासाठी बाकी आहे.

पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे चौथ्या संघाच्या शर्यतीत असले तरी 9 नोव्हेंबरला न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करुन पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. आता उपांत्य फेरीसाठीचा चौथा संघ न्यूझीलंड हा जवळपास निश्चित झाला आहे.

आयसीसीने इम्रान खान यांना फायनलसाठी आमंत्रित केले

विश्वचषक 2023 चे उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी खेळवले जातील. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

अंतिम सामन्यासाठी, आयसीसीने सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना सामना पाहण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. ज्यामध्ये 1992 मध्ये पाकिस्तान संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकून देणारे इम्रान खान यांचाही समावेश आहे.

मात्र, इम्रान खान (Imran Khan) विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहू शकणार नाही. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात असून त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे इम्रान खान विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहू शकणार नाहीत.

पाक संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाचा शेवटचा लीग सामना 11 नोव्हेंबर रोजी इंग्लंडसोबत होणार आहे. जर पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्यांना इंग्लंडचा 200 हून अधिक धावांनी पराभव करावा लागेल. जे इतके सोपे नाही.

त्यानंतर आता पाकिस्तानचा (Pakistan) संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे दिसत आहे. आता केवळ चमत्कार झाला तरच पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत स्थान मिळू शकतो. दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT