Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar Birthday: सचिन म्हणजे बावनकशी सोनंच! फिरकीने घेतलेल्या विकेट ते चपळ फिल्डर; पाहा Video

आयसीसीने सचिन तेंडुलकरचे अनेक जुने व्हिडिओ शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

Pranali Kodre

Sachin Tendulkar 50th Birthday: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज म्हणजे 24 एप्रिल 2023 रोजी वयाची पन्नाशी पूर्ण करत आहे. त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन हा जगातील महान फलंदाजांमध्ये गणला जातो. भारतात तर त्याला क्रिकेटचा देव असंही संबोधलं जातं. सचिनने त्याच्या कारकिर्दीत जी यशाची शिखरे गाठली आहेत, ती भल्याभल्याना गाठणे अशक्य आहे.

वयाच्या 16 वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर तब्बल 24 वर्षे कामगिरीत सातत्य ठेवण्यासारखी किमया सचिनने करून दाखवली आहे. त्याने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहे. त्याच्याकडे पाहून क्रिकेटच्या गेल्या दोन पिढ्या घडल्या आणि यापुढेही घडतील. केवळ एमएस धोनी, विराट कोहलीच नाही, तर स्टिव्ह स्मिथ, जो रूट अशा अनेक परदेशी खेळाडूंसाठी सचिन आदर्श आहे.

याच सचिनने आता वयाची 50 वर्षे पूर्ण केली असल्याने आयसीसीनेही त्याला मानवंदना दिली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर सचिनचे तो खेळाडू म्हणून खेळत असताना अनेक जुने व्हिडिओ शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. सचिनच्या या व्हिडिओंना चाहत्यांकडून मोठी पसंतीही मिळत आहे.

या व्हिडिओंमधून सचिनची डोळ्यांचे पारणे फेडणारे स्ट्रेट ड्राईव्ह देखील पाहायला मिळाले आहेत. इतकेच नाही, तर सचिनच्या अविस्मरणीय खेळींचे हायलाईट्सही पाहायला मिळत आहेत. यामध्ये 2011 वर्ल्डकपमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध केलेली खेळी, सेंच्युरियनला केलेली 96 धावांची खेळी, त्याचे काही सर्वोत्तम शॉट्स पाहायला मिळत आहेत.

याशिवाय त्याची फिल्डींग देखील पाहायला मिळत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सचिन फलंदाजीबरोबरच पार्टटाईम फिरकी गोलंदाजीही करायचा. त्याने त्याच्या फिरकी गोलंदाजीनेही काही सामने भारताला जिंकून दिले आहेत. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओही आयसीसीने शेअर केला आहे.

सचिनची कारकिर्द

सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक 664 सामने खेळताना 48.52 च्या सरासरीने 34357 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 100 शतकांचा समावेश आहे. यातील 463 सामने त्याने वनडे क्रिकेटमध्ये खेळताना 44.83 च्या सरासरीने 49 शतकांसह सर्वाधिक 18426 धावा केल्या आहेत.

तसेच तो 200 कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू असून त्याने कसोटीत 53.78 च्या सरासरीने 51 शतकांसह 15921 धावा केल्या आहे. याशिवाय सचिनने वनडेत 154 विकेट्स घेतल्या आहेत, तसचे कसोटीत 46 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकमेव आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळतानाही 1 विकेट घेतली आहे.

सचिनने 2008 ते 2013 दरम्यान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने आयपीएलमध्ये 78 सामने खेळताना 2334 धावा केल्या आहेत. यामध्येही त्याने 1 शतक आणि 13 अर्धशतके केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT