World Cup 2023
World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: आली घटिका समीप! अहमदाबादमध्ये 10 कर्णधारांच्या उपस्थितीत रंगणार उद्घाटन सोहळा?

Pranali Kodre

ICC Cricket World Cup 2023 opening ceremony set to take place in Ahmedabad in presence of 10 captains :

भारतात वर्ल्डकप 2023 स्पर्धा रंगणार आहे. वर्ल्डकप 2023 च्या मुख्य स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना 2019 वर्ल्डकपचे फायनालिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

त्याआधी 4 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आयोजिक केला जाण्याची शक्यता आहे. तसेच या उद्घाटन सोहळ्यात मोठमोठे सेलिब्रेटी सामील होण्याची शक्यता आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार 4 ऑक्टोबर रोजी सर्व सहभागी 10 संघांचे कर्णधार एकत्र येतील. तसेच आयसीसीचे, जागतिक क्रिकेट प्रशासकीय मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे आणि आयोजक बीसीसीआयचे अधिकारीही उद्घाटन सोहळ्यावेळी एकत्र असतील.

या दिवसाला कॅप्टन्स डे म्हणूनही ओळखले जाते. यावेळी सर्व 10 कर्णधार अहमदाबादमध्ये मीडियाची चर्चा करतील. तसेच फोटोसेशन होईल. त्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे सराव सामने पार पडणार आहेत. त्यामुळे 4 ऑक्टोबरच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी 10 पैकी 6 कर्णधारांना सकाळी फ्लाईट पकडून अहमदाबादला यावे लागणार आहे.

कारण 3 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान हे सराव सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे या ६ संघांच्या कर्णधारांना सराव सामन्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अहमदाबादला पोहचावे लागेल.

दहा संघात रंगणार सामने

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 10 सराव सामने आणि मुख्य स्पर्धेतील 48 सामने असे मिळून एकूण 58 सामने 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे १० संघ सहभागी होणार आहेत.

मुख्य स्पर्धेतील सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात होणार आहेत. तसेच गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद येथे सराव सामने होतील.

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे.

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

SCROLL FOR NEXT