Deepti Sharma | India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

Player of the Month: ICC ने केली डिसेंबरमधील बेस्ट क्रिकेटरची घोषणा! 'या' भारतीय खेळाडूने जिंकला पुरस्कार

ICC Player of the Month: आयसीसीने डिसेंबर 2023 मधील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

ICC Announced Women's and Men's Player of the Month Winners for December 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डिसेंबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. गेल्याच आठवड्यात आयसीसीने डिसेंबर 2023 महिन्यात सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली होती.

त्यातून आता महिलांमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार भारताच्या दिप्ती शर्माने जिंकला आहे. तसेच पुरुषांमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने जिंकला आहे.

दिप्ती डिसेंबरमधील सर्वोत्तम महिला खेळाडू

दिप्तीने डिसेंबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कार जिंकताना संघसहकारी जेमिमा रोड्रिग्स आणि झिम्बाब्वेची प्रिशियस मरांगे यांना मागे टाकले आहे. दिप्तीने डिसेंबर 2023 महिन्यात भारताकडून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शानदार कामगिरी केली होती.

दिप्तीने फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्ही क्षेत्रात तिचे योगदान दिले. तिने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 9 विकेट्स घेतल्या आणि एक अर्धशतकही केले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात तिने 78 धावांची खेळी करण्याबरोबरच गोलंदाजीतही चांगले योगदान दिले होते.

तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तिने डिसेंबर 2023 महिन्यात 225 धावा करण्याबरोबरच 19 विकेट्स घेतल्या.

कमिन्स डिसेंबरमधील सर्वोत्तम पुरुष खेळाडू

डिसेंबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार पॅट कमिन्सने जिंकला. हा पुरस्कार जिंकताना त्याने बांगलादेशच्या तैजुल इस्लाम आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स यांना मागे टाकले.

तैजुल आणि फिलिप्स यांनाही आयसीसीकडून डिसेंबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. कमिन्सने डिसेंबर 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले.

या 2 कसोटीत मिळून त्याने 13 विकेट्स घेतल्या. त्याने मेलबर्नला झालेल्या कसोटीत दोन्ही डावात प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या होत्या, तर पर्थला खेळलेल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून 3 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

SCROLL FOR NEXT