T20 World Cup 2024 Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2024 स्पर्धा कधी आणि कुठे होणार? आयसीसीकडून तारीख अन् ठिकाणांची घोषणा

T20 World Cup 2024 Venue: टी20 वर्ल्डकप पुढीलवर्षी होणार असून ही स्पर्धा कुठे आणि कधी होणार आहे, याबद्दल आयसीसीने माहिती दिली आहे.

Pranali Kodre

ICC announced West Indies and USA venues for Men's T20 World Cup 2024:

येत्या काही वर्षात अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत, यात टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचाही समावेश आहे. या स्पर्धेचे आयोजन कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजमध्ये आणि अमेरिकेमध्ये करण्यात येणार आहे. 2024 मध्ये 4 ते 30 जून दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

आता आयसीसीने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन होणाऱ्या 10 ठिकाणांवर शिक्कामोर्तब केले आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिजमधील 7 ठिकाणांवर सामने होणार आहेत, तर अमेरिकेतील 3 ठिकाणी सामने होणार आहे.

यातील अमेरिकेतील तीन ठिकाणे यापूर्वीच निश्चित झाली होती. वेस्ट इंडिजमधील अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डॉमनिका, गयाना, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट विंन्सेंट आणि ग्रेनाडिन्स या सात ठिकाणी टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन होणार आहे.

त्याचबरोबर अमेरिकेतील डेलास, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.

अमेरिकेत डेलासमधील ग्रँड प्रेरी, फ्लोरिडामधील ब्रोवर्ड काउंटी आणि न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटीच्या मैदानात सामने होणार आहेत.

दरम्यान, आता या 10 ठिकाणांवरील स्टेडियमला वर्ल्डकप स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन करण्याइतपत सज्ज करावे लागणार आहे. त्यासाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या क्रिकेट बोर्डांना काम करावे लागणार आहे.

वीस संघात थरार

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघात मिळून 55 सामने खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिले 8 संघ म्हणजेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याबरोबरच टी20 क्रमवारीत पहिल्या 10 संघांमध्ये असेलल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना थेट पात्रता मिळाली आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे यजमान असल्याने त्यांनाही थेट पात्रता मिळाली आहे. याशिवाय पापुआ न्यू गिनी (PNG) संघाने इस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफिकेशनमधून पात्रता मिळवली आहे, तर आयर्लंड आणि स्कॉटलंड युरोप रिजन क्वालिफायरमधून पात्र ठरले आहेत.

आता अमेरिका क्वालिफायर, आफ्रिका क्वालिफायर आणि आशिया क्वालिफायरमधून आणखी 5 संघ पात्र ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Finance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT