Australia Dainik Gomantak
क्रीडा

ICC 2023 कसोटी संघात तब्बल 5 ऑसी क्रिकेटरला स्थान; भारताच्या फिरकी जोडीची निवड

ICC Test Team of the Year 2023: आयसीसीने 2023 मधील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली असून यात भारताच्या दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

Pranali Kodre

ICC announced Test Team of the Year 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून मंगळवारी (23 जानेवारी) 2023 वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात 2023 मध्ये कसोटीत शानदार कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीच्या 2023 सर्वोत्तम कसोटी संघात ऑस्ट्रलियन खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली कसोटी चॅम्पियशीपही पटकावली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत केले होते.

दरम्यान, आयसीसीच्या कसोटी संघात पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, ऍलेक्स कॅरे, मिचेल स्टार्क या पाच खेळाडूंना स्थान मिळाले आहे. कमिन्सला या संघाचे कर्णधारही करण्यात आले आहे. कॅरेकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तसेच भारताची फिरकी गोलंदाजांची जोडी आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनाही आयसीसीच्या या कसोटी संघात स्थान मिळाले आहे. या दोनच भारतीय खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे.

याशिवाय श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला, न्यूझीलंडचा फलंदाज केन विलियम्सन, इंग्लंडचा फलंदाज जो रूट आणि वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांना या संघात संधी देण्यात आली आहे. यातील ब्रॉडने गेल्याच वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याने निवृत्ती घेण्याआधी 2023 मध्ये शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते.

संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंची कामगिरी

आयसीसीच्या या संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंच्या 2023 मधील कसोटी कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास सलामीवीर म्हणून स्थान मिळालेल्या उस्मान ख्वाजाने १३ सामन्यांमध्ये १२१० धावा केल्या. तो कसोटीत 2023 वर्षात हजार धावा पार करणारा एकमेव खेळाडू आहे. तसेच करुणारत्नेने 6 सामन्यांमध्ये 64 च्या सरासरीने 608 धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर विलियम्सनला संधी मिळाली असून त्याने 7 कसोटी सामन्यांत 4 शतकांसह 57 च्या सरासरीने 695 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर जो रुट असून त्याने या वर्षात 8 सामने खेळताना 65 च्या सरासरीने 787 धावा केल्या आहेत.

पाचव्या क्रमांकावर अष्टपैलू ट्रेविस हेड असून त्याने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाला कसोटी चॅम्पियशीप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने अंतिम सामना सामनावीर पुरस्कारही जिंकला होता. त्याने या वर्षात कसोटीत 12 सामन्यांत 41 च्या सरासरीने 919 धावा केल्या आहेत. तसेच 4 विकेट्स घेतल्या आहेत.

यष्टीरक्षक म्हणून संधी मिळालेल्या ऍलेक्स कॅरेने 13 सामन्यांमध्ये 461 धावा केल्या आहेत. तसेच त्याने यष्टीमागे 54 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 10 यष्टीचीत केले आहेत आणि 44 झेल घेतले आहेत. अष्टपैलू रविंद्र जडेजाने 2023 वर्षात 7 कसोटी सामने खेळताना 33 विकेट्स घेतल्या, त्याचबरोबर 281 धावा केल्या आहेत.

तसेच या संघात कर्णधार केलेल्या पॅट कमिन्ससाठीही 2023 वर्ष शानदार राहिले. त्याने या वर्षात कसोटीत 11 सामन्यांत 42 विकेट्स घेण्याबरोबर फलंदाजीत 254 धावा केल्या आहेत. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने 2023 वर्षात 7 सामन्यांत 41 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर दहाव्या क्रमांकावर मिचेल स्टार्क आणि अकराव्या क्रमांकावर स्टुअर्ट ब्रॉड हे वेगवान गोलंदाज आहेत. स्टार्कने 9 कसोटीत 38 विकेट्स घेतल्या आहेत, तर ब्रॉडने 8 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत.

  • आयसीसी कसोटी संघ 2023 – उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, केन विलियम्सन, जो रुट, ट्रेविस हेड, रविंद्र जडेजा, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

SCROLL FOR NEXT