India vs Australia | World Cup 2023 Final 
क्रीडा

ICC कडून वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा 12 जणांचा सर्वोत्तम संघ जाहीर! कर्णधार रोहितसह 6 भारतीयांना संधी

ICC World Cup 2023 Team: आयसीसीने वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सर्वोत्तम 12 जणांचा संघ जाहीर केला आहे.

Pranali Kodre

ICC announced Cricket World Cup 2023 Team of the Tournament:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) पार पडला. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्ने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले.

या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेतील सर्वोत्तम 11 जणांचा संघ निवडला आहे. आयसीसीने सलामीवीर म्हणून क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांची निवड केली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉकने या स्पर्धेत 10 सामन्यांत 107.02 च्या स्ट्राईक रेटने 594 धावा केल्या. त्याच्या यात 4 शतकांचा समावेश आहे. तो या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याचबरोबर तो यष्टीरक्षक म्हणूनही या संघात असेल, त्याने यंदाच्या स्पर्धेत यष्टीमागे २० विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच भारताच्या रोहितने या स्पर्धेत 11 सामन्यांत 597 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. आयसीसीने रोहितकडे या संघाचे कर्णधारपदही सोपवले आहे.

आयसीसीने तिसऱ्या क्रमांकावर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला संधी दिली आहे. विराटने 11 सामन्यांत सर्वाधिक 765 धावा या स्पर्धेत केल्या. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर डॅरिल मिचेलला संधी देण्यात आली असून त्याने यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंडकडून 2 शतकांसह 552 धावा केल्या.

पाचव्या क्रमांकावर भारताच्या केएल राहुलला संधी दिली असून त्याने 75.33 च्या सरासरीने यंदाच्या स्पर्धेत 452 धावा केल्या आहेत.

सहाव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली आहे. मॅक्सवेलने यंदाच्या स्पर्धेत 40 चेंडूत शतक केले होते, जे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठरले. त्याने या स्पर्धेत 201 धावांची सर्वोच्च धावांची खेळी केली होती. त्याने 9 सामन्यांत 400 धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने 6 विकेट्स घेतल्या.

आयसीसीने सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजाला संधी दिली आहे. जडेजाने यंदाच्या स्पर्धेत भारतासाठी खालच्या फळीत फलंदाजी करताना आणि गोलंदाजीवेळी मधल्या षटकात विकेट्स घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 5 डावात 120 धावा केल्या, तर 16 विकेट्स घेतल्या.

आयसीसीने आठव्या क्रमांकावर भारताच्या जसप्रीत बुमराहला संधी दिली आहे. त्याने या स्पर्धेत 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच नवव्या क्रमांकावर श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाला संधी दिली आहे. डावखुऱ्या मदुशंकाने यंदाच्या स्पर्धेत 21 विकेट्स घेतल्या. तो सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.

आयसीसीने दहाव्या क्रमांकावर ऍडम झम्पाला संधी दिली, तर आकराव्या क्रमांकावर भारताच्या मोहम्मद शमीला संधी दिली आहे. शमी आणि झम्पा हे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे अनुक्रमे पहिले आणि दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज ठरले आहेत. शमी 7 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या, तर झम्पाने 11 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर 12 वा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या गेराल्ड कोएट्झीला आयसीसीने संधी दिली आहे. त्याने या स्पर्धेत 20 विकेट्स घेतल्या आहेत.

आयसीसीचा वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सर्वोत्तम संघ -

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक) (द. आफ्रिका), रोहित शर्मा (कर्णधार) (भारत), विराट कोहली (भारत), डॅरिल मिचेल (न्यूझीलंड), केएल राहुल (भारत), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), रविंद्र जडेजा (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका), ऍडम झम्पा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद शमी (भारत), गेराल्ड कोएट्झी (12 वा खेळाडू), (द. आफ्रिका)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

SCROLL FOR NEXT