AB de Villiers | Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

AB de Villiers on Shubman Gill: गिलने 'मिस्टर 360'लाही पाडली भूरळ! म्हणाला, 'माझ्याकडे शब्दच...'

गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुभमन गिलने एबी डिविलियर्सने तोंडभरून कौतुक केले आहे.

Pranali Kodre

AB de Villiers on Shubman Gill: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध 62 धावांनी विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विजय मिळवत गुजरातने अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुभमन गिलने शतकी खेळी केली.

गिलने 49 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. त्याने या सामन्यात एकूण 129 धावांची खेळी केली. ही खेळी गिलने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने केली. दरम्यान हे गिलचे आयपीएल 2023 हंगामातील तिसरे शतक ठरले आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एबी डिलिविलियर्सकडून कौतुक

दक्षिण आफ्रिकेचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सनेही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. 'मिस्टर 360' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिविलियर्सने गिलच्या तिसऱ्या आयपीएल शतकानंतर त्याचे कौतुक करताना ट्वीट केले आहे की 'शुभमन गिल! वाह, माझ्याकडे खरंच शब्द नाहीत.'

तसेच डिविलियर्सने पुढे लिहिले की 'योग्य क्षण ओळखण्याची आणि वेग वाढवण्याची त्याची क्षमता, त्याचे सातत्य यामुळे त्याने त्याचा स्वत:चा दर्जा बनवला आहे. हे देखील लक्षात ठेवा, त्याने सर्वाधिक सामने अहमदाबाद येथे खेळले आहेत, जिथे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. शुभमन मस्त खेळलास.'

तिसरे शतक

गिलने आयपीएल 2023 हंगामात याआधी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 101 धावांची खेळी केली होती, तसेच त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद 104 धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो एका आयपीएल हंगामात 3 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2016 साली विराट कोहलीने 4 शतके आणि 2022 साली जॉस बटलरने 4 शतके केली आहेत.

गुजरातने मिळवला विजय

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 233 धावा केल्या होत्या. त्यानंतर 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 18.2 षटकात सर्वबाद 171 धावाच करता आल्या. गुजरातकडून मोहित शर्माने गोलंदाजीत शानदार कामगिरी करत 5 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT