Mumbai Indians: मुंबईला का करावं लागलं IPL 2023 मधून पॅकअप? जाणून घ्या 3 मोठी कारणं

मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे, त्यांना या हंगामात 3 गोष्टींचा मोठा फटका बसला.
Mumbai Indians IPL
Mumbai Indians IPLDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Indians IPL 2023 campaign: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील टॉप दोन संघ मिळाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तसेच या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स संघ राहिला.

मुंबई इंडियन्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरातविरुद्ध 62 धावांनी पराभव स्विकारला. त्यामुळे मुंबईचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले. सुरुवातीला 7 पैकी तीनच सामने जिंकलेल्या मुंबईने दुसऱ्या टप्प्यात चांगली पुनरागमन केले होते.

पण प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून कडवी टक्करही मिळाली, पण हा अडथळा पार करत मुंबईने गुणतालिकेतील चौथे स्थान मिळवले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, मुंबईची या हंगामातील कामगिरी संमिश्र राहिली असली, तरी त्यांच्या संघाकडून काही चूकाही झाल्या. याचबद्दल आढावा घेऊ.

Mumbai Indians IPL
IPL 2023: नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांमध्ये धक्काबुक्की! Video ने उडवली खळबळ

1. रोहित शर्माची कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे नेतृत्व या हंगामात शानदार राहिले आहे. पण त्याची वैयक्तिक कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सची सलामी भागीदारीही फारशी मोठी झालेली दिसली नाही.

जरी मुंबई इंडियन्सने या हंगामात 4 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला असला तरी, रोहित शर्माच्या मोठ्या धावांच्या खेळीची कमतरता अनेकदा जाणवली. रोहितने 16 सामन्यांमध्ये 20.75 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह केवळ 332 धावा केल्या.

2. आर्चर - बुमराहच्या दुखापतीचा फटका

मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला तो जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा. बुमराह जवळपास गेल्या दशकापासून मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकदा मुंबई इंडियन्सला त्याच्या गोलंदाजीने सामने जिंकून दिले आहेत. पण यंदा तो मुंबई इंडियन्ससाठी पाठीच्या दुखापतीमुळे उपलब्ध नव्हता.

तसेच गेल्यावर्षी 8 कोटींचा खर्च करून मुंबईने संघात घेतलेला जोफ्रा आर्चर या हंगामात मुंबईकडून खेळण्यासाठी आला होता. पण तो या हंगामात केवळ 5 सामनेच खेळू शकला. तसेच दुसऱ्या टप्प्यात तो कोपराला झालेल्या दुखापतीमुळे या हंगामातूनही बाहेर झाला.

त्याचमुळे मुंबईला बुमराह आणि आर्चर हे दोन्ही अनुभवी वेगवान गोलंदाज संघातून बाहेर झाल्याचा मोठा फटका बसला. मुंबईला अखेरच्या षटकांमध्ये त्यांची कमी सर्वाधिक जाणवली.

Mumbai Indians IPL
IPL 2023 Qualifier: मुंबईला पराभूत करत गुजरात फायनलमध्ये! गिलची सेंच्यूरी अन् मोहितची बॉलिंग रोहितसेनेला भारी

3. गोलंदाजीतील बिघडलेले संतुलन

आर्चर आणि बुमराह हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याने मुंबईचे गोलंदाजी संतुलनही बिघडलेले दिसले. मुंबईला अखेरपर्यंत योग्य गोलंदाजी संयोजन मिळाले नाही. त्यांच्याकडून पीयुष चावलाने केवळ सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली. पण त्याला साथ देण्यासाठी दुसऱ्या अनुभवी फिरकीपटूची कमी मुंबईला जाणवली.

तसेच आकाश मधवालने अखेरच्या काही सामन्यांमध्ये संघात स्थान मिळवत प्रभाव पाडला. पण त्यालाही योग्य साथ अन्य गोलंदाजांकडून मिळाली नाही. जेसन बेऱ्हेंडॉर्फच्या कामगिरीत चढ-उतार राहिला.

तसेच मुंबईने कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, रिली मेरिडिथ, ड्युआन यान्सिन अशा अनेक खेळाडूंचे पर्यायही वापरून पाहिले. मात्र त्यांना गोलंदाजीसाठी योग्य कॉम्बिनेशन सापडले नाही. त्यांनी आर्चरऐवजी ख्रिस जॉर्डनलाही संघात घेतले होते. पण तोही फारसा प्रभाव पाडू शकला नाही.

एकूणच मुंबईने संपूर्ण हंगामात गोलंदाजी स्थिर राहिली नाही. त्याचाच मोठा फटका मुंबईला बसला. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली, तरी गोलंदाजी संतुलित नसल्याने प्रतिस्पर्धी संघही मुंबईविरुद्ध मोठी धावसंख्या उभारताना दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com