Stéphanie Frappart Dainik Gomantak
क्रीडा

First Women Referee In FIFA World Cup: फ्रान्सच्या स्टेफनीने रचला इतिहास; फुटबॉल वर्ल्डकपमध्ये बनली पहिली महिला रेफ्री

आणखी दोन महिलांना संधी; रवांडाच्या सलीमा मुकानसांगा, जपानच्या यामाशिता यांचा समावेश

Akshay Nirmale

First women Refree In FIFA World Cup: फ्रान्सच्या रेफ्री स्टेफन फ्रेपर्ट (Stéphanie Frappart) या पुरूषांच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत जबाबदारी सांभाळणारी पहिली महिला रेफ्री बनल्या आहेत. ग्रुप सी मध्ये मेक्सिको आणि पोलंड यांच्यात झालेल्या सामन्यात त्यांनी चौथा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.

(FIFA World Cup 2022)

38 वर्षीय स्टेफनी यांनी यापुर्वी 2020 मध्ये पुरूष चँपियन्स लीग स्पर्धेमध्येही पहिली महिला रेफ्री बनण्याचा मान मिळवला होता. हा सामना ज्युवेंट्स आणि डायनामो कीव्ह या संघात झाला होता. याशिवाय लीग-1, यूरोपा लीग, फिफा वर्ल्डकपच्या पात्रता सामन्यांमध्येही त्यांनी रेफ्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

यंदाच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच तीन महिलांना रेफ्री म्हणून संधी देण्यात आली आहे. उर्वरीत दोघींमध्ये रवांडा देशाच्या सलीमा मुकानसांगा आणि जपानच्या यामाशिता यांचा समावेश आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एकुण 36 रेफ्रींची निवड करण्यात आली आहे. यात तीन महिला रेफ्रींचा समावेश आहे. याशिवाय 69 असिस्टेंट रेफ्रींची निवडही करण्यात आली आहे.यात ब्राझीलच्या नुझा बॅक, मेक्सिकोच्या करेन डियाज मदिना आणि अमेरिकेच्या कॅथरीन नेबिस्टा यांचा समावेश आहे.

Yoshimi Yamashita (Japan) Salima Mukansanga (Rwanda)

स्टेफनी फ्रॅपर्ट या आधी वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत आणि चॅम्पियन्स लीगमध्येही पुरूषांच्या मॅचमध्ये रेफ्री म्हणून काम केले आहे. 2019 च्या महिला वर्ल्डकप स्पर्धेत त्यांनी रेफ्री म्हणून काम पाहिले आहे. या वर्षी पुरूषांच्या फ्रेंच कप फायनलमध्ये त्यांनी रेफ्री म्हणून काम केले होते.

मेक्सिको विरूद्ध पोलंड सामन्यात दोन्ही संघांना गोल करता आले नाही. हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवनडॉस्की याला पेनल्टीवरही गोल करता आला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT