Virat Kohli-Anushka Sharma: बापरे! विराट-अनुष्का भाड्याने घेतलेल्या फ्लॅटसाठी मोजले 'इतके' लाख

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी जुहूमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे.
Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma and Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli and Anushka Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. त्यांच्या क्षेत्रातील कामगिरीव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चा होत असते. अशातच आता असे समोर आले आहे की विराट आणि अनुष्का यांनी जुहूमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे.

लाखोंचा फ्लॅट भाड्याने

रिपोर्ट्सनुसार विराट (Virat Kohli) आणि अनुष्का (Anushka Sharma) यांनी मुंबईतील जुहूमध्ये हाय-टाईड बिल्डिंगमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला आहे. हा फ्लॅट चौथ्या मजल्यावर असून त्यातून अरबी समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. हा फ्लॅट 1650 स्क्वेअर फूटचा आहे.

Anushka Sharma and Virat Kohli
BCCI Will Review Team India: रोहित, विराट, द्रविड यांना बीसीसीआय घेणार फैलावर

या फ्लॅटचे भाडे तब्बल 2.76 लाख म्हणजेच जवळपास पावणे तीन लाख रुपये आहे आणि या फ्लॅटसाठी विराट - अनुष्का यांनी साडे सात लाख रुपये डिपोझिट दिले आहे. एवढा महागडा हा फ्लॅट माजी क्रिकेटपटू समरजीत सिंग गायकवाड यांच्या मालकीचा आहे.

किशोर कुमार यांचा बंगलाही घेतलाय लीजवर

विराट-अनुष्का यांनी ऑक्टोबर 2022 मध्येच दिग्गज गायक किशोर कुमार यांचा जुहूमधील एक बंगलाही लीजवर घेतला आहे. तिथे त्यांनी एक रेस्टॉरंट सुरू केले असून ज्याचे नाव वन8 आहे.

Anushka Sharma and Virat Kohli
Anushka Sharma Beauty Tips: अनुष्का ग्लोइंग स्किनसाठी वापरते 'हा' खास फेसपॅक

दरम्यान, विराट-अनुष्का यांचा स्वत:च्या मालकिचा मोठा फ्लॅट वरळीमध्येही आहे. वरळीतील ओमकार बिल्डिंगमधील 35 व्या मजल्यावर असलेला त्यांचा हा फ्लॅट जवळपास 34 कोटी रुपयांचा असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर वर्सोवामध्ये अनुष्काचाही एक फ्लॅट आहे. असे असतानाही त्यांनी जुहूमध्ये फ्लॅट भाड्याने का घेतला आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

त्याचबरोबर भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असला तरी विराटला या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com