Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

हार्दिक पांड्या कसोटीमधून घेणार निवृत्ती? 'या' फॉरमॅटला करणार अलविदा!

T20 विश्वचषक 2021 मध्ये अत्यंत खराब कामगिरीनंतर टीम इंडियातून (Team India) बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) निवृत्ती घेऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषक 2021 मध्ये अत्यंत खराब कामगिरीनंतर टीम इंडियातून (Team India) बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) निवृत्ती घेऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असून करिअर करण्यासाठी तो क्रिकेटचा फॉरमॅट सोडू शकतो. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या कसोटी फॉरमॅटमधून (Test Format) निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे.

इनसाइड स्पोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 'बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी सांगितले की, हार्दिक पांड्या दुखापतीशी झुंज देत असून तो कसोटीतून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. मात्र त्याने अद्याप याबाबत बोर्डाला अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. हार्दिक पंड्या अद्याप टीम इंडियाच्या कसोटी योजनेचा भाग नाही. मात्र, त्याची निवृत्ती टीम इंडियासाठी मोठा झटका असेल आणि संघाला त्याचा बॅकअप लवकरात लवकर शोधावा लागेल. दरम्यान, इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की, हार्दिक पांड्या वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी कसोटीला अलविदा करु शकतो. हार्दिक

पांड्याला 2019 मध्ये पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून पांड्याला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करता आली नाही, त्यामुळे त्याला याचा फटका सहन करावा लागत आहे.

तसेच, दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे. तो पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करु शकत नाही. आयपीएल 2021 आणि T20 विश्वचषकात उत्तम कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. गेल्या एका वर्षात हार्दिक पांड्याला ODI-T20 मध्ये एकूण 46 षटके टाकता आली आहेत, त्यात देखील त्याची गोलंदाजी म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळेच हार्दिक पांड्या संघाबाहेर आहे.

शिवाय, हार्दिक पांड्या सध्या त्याच्या फिटनेसवर काम करत असून मिडिया रिपोर्टनुसार तो विजय हजारे ट्रॉफी खेळणार नाही. हार्दिक पांड्यासाठी फार कमी वेळ शिल्लक आहे, कारण पुढील दोन वर्षात टीम इंडियाला टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. हार्दिक फिट नसेल तर त्याचे आणि टीम इंडियाचे मोठे नुकसान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT