Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya Complaint: टी-20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद ठरला 'वादग्रस्त'! हार्दिक पांड्याच्या 'त्या' सेलिब्रेशनवरुन पुण्यात तक्रार दाखल; काय नेमकं प्रकरण? VIDEO

National Flag Insult Allegation: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका कायदेशीर कचाट्यात सापडला.

Manish Jadhav

Hardik Pandya Complaint: टीम इंडियाने 8 मार्च 2026 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करुन तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असतानाच, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका कायदेशीर कचाट्यात सापडला. विश्वचषक विजयाचा जल्लोष साजरा करताना राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप हार्दिकवर करण्यात आला असून याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वकील वाजेद खान यांनी ही तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या तक्रारीत असा आरोप केला की, विजयाचा आनंद साजरा करत असताना हार्दिक पांड्याने राष्ट्रध्वज आपल्या शरीराभोवती गुंडाळला होता आणि तो आपल्या मैत्रिणीसोबत डान्स करत होता. तक्रारदाराने 'एएनआई'शी बोलताना राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक कायदा 1971 (National Honour Act 1971) चा संदर्भ दिला. वाजेद खान यांच्या म्हणण्यानुसार, या कायद्याच्या कलम 2 नुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, हार्दिक पांड्या विजयाच्या धुंदीत इतका मग्न होता की, त्याने तिरंगा पांघरुन आपल्या मैत्रिणीसोबत जमिनीवर लोळण घेतले, जे राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्याचेही तक्रारदाराने सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला ही घटना आमच्या कार्यक्षेत्रात घडली नसल्याचे सांगितले होते, परंतु राष्ट्रध्वज हा संपूर्ण देशाचे प्रतीक असून त्याची तक्रार कुठेही करता येते, असे पटवून दिल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार स्वीकारली आणि त्याची एक प्रत तक्रारदाराला दिली. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करुन कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या अर्जावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे हा वाद सुरु असतानाच, हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या विश्वचषकात केलेली कामगिरी विसरता येण्यासारखी नाही. भारताला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण स्पर्धेत हार्दिकने 9 सामन्यांत 27.12 च्या सरासरीने 217 धावा कुटल्या, ज्यात दोन धडाकेबाज अर्धशतकांचा समावेश होता. केवळ फलंदाजीच नव्हे, तर गोलंदाजीतही त्याने कमाल दाखवत 9 बळी टिपले. विशेषतः इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने टाकलेले 19 वे षटक भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी निर्णायक ठरले होते. मैदानावर भारतासाठी 'हिरो' ठरलेला हार्दिक आता या कायदेशीर तक्रारीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT