Hardik Pandya: टीम इंडियाचा धक्कादायक निर्णय! न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पंड्या संघाबाहेर? बुमराहलासुद्धा विश्रांती

India vs New Zealand ODI series: हार्दिक पंड्या दुखापतीतून सावरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्याही एकदिवसीय मालिकेत तो खेळला नव्हता; मात्र टी-२० मालिकेत तो सहभागी झाला होता.
Hardik Pandya Record
Hardik Pandya RecordDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: टी-२० विश्वकरंडक आणि त्याअगोदर होणारी न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका यामुळे याच न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून हार्दिक पंड्याला विश्रांती देण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ३ किंवा ४ जानेवारीला करण्यात येण्याची शक्यता आहे.

हार्दिक पंड्या दुखापतीतून सावरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्याही एकदिवसीय मालिकेत तो खेळला नव्हता; मात्र टी-२० मालिकेत तो सहभागी झाला होता. विश्वकरंडक स्पर्धेसाठी हार्दिक पंड्या महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे, त्यासाठी त्याला आता निवडक सामन्यांत खेळवले जाईल.

न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १४ आणि १८ जानेवारीला पुढचे दोन सामने नियोजित आहेत. हार्दिकप्रमाणे जसप्रीत बुमलाही विश्रांती दिली जाईल. २०२३च्या विश्वकरंडक अंतिम सामन्यानंतर बुमरा एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

Hardik Pandya Record
Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

भारताच्या एकदिवसीय सामन्यांसाठी सध्या तरी बुमराचा विचार केला जात नाही. बीसीसीआयशी करार असलेल्या सर्व खेळाडूंना विजय हजारे करंडक स्पर्धेत किमान दोन सामने खेळणे बंधनकारक आहे; मात्र बुमराला यातून अपवाद करण्यात आलेले आहे.

Hardik Pandya Record
Virat Kohli: '..ये ऐसेही किंग नही है'! विराट कोहलीचे सरावाला प्राधान्य; हजारे करंडकमध्ये दिल्लीसाठी खेळणार 3रा सामना

हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता नसली तरी तो विजय हजारे करंडक स्पर्धेत बडोदा संघातून दोन सामने खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भ आणि चंडीगड यांच्याविरुद्ध अनुक्रमे ३ आणि ८ जानेवारीला होणाऱ्या सामन्यात तो खेळेल, असे सांगण्यात येत आहे; मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com