Hardik Pandya Record: हार्दिक पंड्याचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'! 'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Hardik Pandya: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला.
Hardik Pandya Record
Hardik Pandya RecordDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला. या सामन्यात हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विकेट घेऊन भारतासाठी इतिहास रचला. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूने अशी कामगिरी केली नव्हती.

हार्दिक पंड्याने इतिहास रचला

या सामन्यात हार्दिक पंड्याने ट्रिस्टन स्टब्सला बाद केले. या विकेटसह, तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी १०० विकेट घेणारा आणि १००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी इतर कोणत्याही अष्टपैलू खेळाडूने ही कामगिरी केली नव्हती. पण आता पंड्याचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले आहे.

Hardik Pandya Record
Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

टी-२० मध्ये भारतासाठी १०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पांड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी यापूर्वी टी-२० मध्ये भारतासाठी १०० बळी घेतले आहेत.

Hardik Pandya Record
Goa Weather: पारा घसरला! थंडीची लाट कायम, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळीही घरांमध्ये गारवा

दक्षिण आफ्रिकेने केवळ १४ षटकांत सहावी विकेट गमावली आहे. संघाची धावसंख्या फक्त ६९ धावा आहे. एडेन मार्कराम व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाने लक्षणीय कामगिरी केलेली नाही. सलामीवीर क्विंटन डी कॉकने १, रीझा हेंड्रिक्सने ० धावा केल्या.

डेवाल्ड ब्रेव्हिसने २ आणि ट्रिस्टन स्टब्सने ९ धावा केल्या. दरम्यान, डोनोव्हन फरेरा यांनी १५ चेंडूत २० धावा केल्या. हे वृत्त लिहिताना, हर्षित राणाने २, अर्शदीप सिंगने १, हार्दिक पंड्याने १, वरुण चक्रवर्तीने १ आणि शिवम दुबेने १ बळी घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com