Hardik Pandya
Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

पैसा मिळाला नाही तर खेळाडू मैदानात उतरणार नाहीत: हार्दिक पांड्या

दैनिक गोमन्तक

टीम इंडियामधील (Team India) असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा खूप कष्टामध्ये जीवन व्यतित केले. यातच भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिध्द असलेल्या हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) एका छोट्या अपार्टमेंटमध्ये (Baroda) राहण्यापासून ते मुंबईत (Mumbai) आलिशान मालमत्ता घेण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण होता. आपल्या कौशल्य आणि प्रतिभेमुळे तो केवळ भारतासाठीच नव्हे तर त्याच्या आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्समध्येही (Mumbai Indians) प्रतितयश संपादन केले. हार्दिक पंड्या गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी एक परिपूर्ण फिनिशरची भूमिका निभावत आहे. परंतु हार्दिक सध्या गोलंदाजी करत नाही, जे संघांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. हार्दिक पंड्याने टी -20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup) पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवावा अशी क्रिकेटप्रेमींकडून इच्छा व्यक्त केली जात आहे.

हार्दिक पंड्याने आयपीएल लिलावात मिळणारी मोठी रक्कम आणि त्याचा खेळाडूंच्या जीवनावर कसा परिणाम होतो, आणि आयपीएलमध्ये करार मिळाल्यानंतर काय बदल होतात याबद्दल सांगितले आहे. क्रिकेट मंथलीशी बोलताना हार्दिक म्हणाला, " सध्या काय चालू आहे ते समजून घेण्यासाठी तुम्हाला मन घट्ट करुन जाणून घेण्याची गरज आहे. मी आणि कृणाल खूप मजबूत होतो, म्हणून आम्ही पैसा आपल्या जीवनात तेवढाच महत्त्वाचा असल्याचे सत्य स्वीकारण्यास सक्षम बनलो. परंतु पैसा किती महत्त्वाचा आहे हे सुनिश्चित करताना आम्ही कधीही याचं भान हरवलो नाही. कदाचित मी हवेत असं सर्वांना वाटत असेल मात्र मी कधीही या गोष्टींचे भान विसरलेलो नाही. आपण आपल्या मूळ संस्कारांशी कधीही प्रतारणा केली नाही पाहिजे. माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला चांगले जीवन मिळावे हे प्राधान्य आहे."

क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना खेळाडूला मिळणारा पैसा कसा महत्त्वाचा आहे, हेही पंड्याने उघडपणे सांगितले. ऑफरवर बरीच मोठी रक्कम खेळाडूंना मिळत असते. त्या रकमेमधून आपल्या कुटुंबियांचे आयुष्य कसे सुधारता येईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्याने असेही म्हटले आहे की, जर क्रिकेटमध्ये मोठ्याप्रमाणात पैशांची गुंतवणूक नसती तर बरेच क्रिकेटपटू या क्रिडा प्रकारापासून वंचित राहिले असते. तो पुढे म्हणाला, "2019 मध्ये, मी एका व्यक्तीशी बोलत असताना तो मला म्हणाला होता की, पैसा हा तुमच्यासाठी दुय्यम असेल ना, मात्र यावर मी त्या व्यक्तीच्या व्यक्तव्याशी असहमत होतो. जेव्हा एखाद्या खेड्यात किंवा छोट्या शहरामधील मुलाला मोठ्या गोष्टी मिळतात तेव्हा तो स्वतःसाठी काही न ठेवता आई -वडिलांची काळजी घेण्यासाठी खर्च करतो, तसेच तो आपल्या नातेवाईकांचीही काळजी घेतो. यामध्ये पैशामुळे काही एक फरक पडत नाही. लोकांमध्ये पैशाबद्दल विचार करावा लागतो असा एक गैरसमज आहे. मात्र माझा त्यावर विश्वास नाही, कारण तुम्ही खेळ आणि पैशाच्या बाबतीतही उत्कट असतात. पैशाशिवाय, किती लोक क्रिकेट खेळतील हे माहित नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Laxmikant Parsekar: पार्सेकरांची झाकली मूठ कायम, गूढ वाढले! तानावडे पुन्हा घेणार भेट; पाऊणतासाची बैठक निर्णयाविना

Tivim Crime: पैशांच्या वसुलीसाठी अभियंत्याचे अपहरण; कोलवाळ पोलिसांनी तिघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

देशवासीयांना आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT