IPL 2023, CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 चा अंतिम सामना रिजर्व्ह डे ला (29 मे) होणार आहे.
एकीकडे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला पाचव्या आयपीएल विजेतेपदासह सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याऱ्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी साधायची आहे.
तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्ससमोर दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य असेल. या सामन्यात गुजरातने ट्रॉफी जिंकली तर हार्दिक पांड्याच्या नावावर एक मोठा विक्रम होईल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्या IPL 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने ट्रॉफी जिंकली, तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा खेळाडू म्हणून सर्वाधिक वेळा IPL ट्रॉफी जिंकणारा खेळाडू बनेल.
पांड्याने एक खेळाडू म्हणून 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्याचबरोबर, धोनीला फक्त 4 वेळा हे करता आले आहे, पण CSK जिंकल्यास धोनी हार्दिकशी बरोबरी करेल. मात्र, तो त्याचा विक्रम मोडू शकणार नाही.
आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवले, तर एकदा 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सचा खेळाडू म्हणून विजेतेपद पटकावले.
त्याचवेळी, हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघात असताना चार वेळा ट्रॉफी जिंकली आहे, तर गुजरात टायटन्सने त्याच्या नेतृत्वाखाली एकदा विजेतेपद पटकावले आहे. यावेळी, जिंकण्यासोबतच तो रोहित शर्मासोबत खेळाडू म्हणून सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकणारा खेळाडू बनेल.
रोहित शर्मा - 6
हार्दिक पांड्या - 5
जसप्रीत बुमराह - 5
किरॉन पोलार्ड - 5
आदित्य तारे - 5
अंबाती रायुडू - 5
लसिथ मलिंगा - 4
एमएस धोनी - 4
सुरेश रैना - 4
हरभजन सिंग - 4
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.