Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2024 साठी या खेळाडूला टीम इंडियाचा कर्णधार बनवा, दिग्गजांची मागणी

दैनिक गोमन्तक

Indian Team: टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता भारताचा माजी स्फोटक सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी या स्टार खेळाडूला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया...

श्रीकांत यांनी हे निवेदन दिले

माजी क्रिकेटर कृष्णमाचारी श्रीकांत स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात म्हणाले की, '2024 च्या विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टीम इंडियाचा कर्णधार बनवावे.' ते पुढे म्हणाले की, ''संघाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया आजपासूनच सुरु झाली पाहिजे. हे काम आठवडाभरात सुरु होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेपासून सुरु व्हायला हवे.''

आता सुरुवात करावी लागेल

कृष्णमाचारी श्रीकांत पुढे म्हणाले की, 'तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायची आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्यासाठी दोन वर्षे आधीच तयारी सुरु करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे आहे, मग तो कुठलाही प्रयोग असो किंवा काही, तो वर्षभरात करा. मात्र 2023 पर्यंत संघ तयार करा, आणि हा संघ विश्वचषकात खेळेल याची खात्री करा.'

हार्दिक पांड्या कर्णधार

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या मालिकेत भारत तीन टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामने खेळणार आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT