Harbhajan Singh Dainik Gomantak
क्रीडा

बल्ले बल्ले! वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि पठाण ब्रदर्स पुन्हा एकदा मैदानावर झळकणार

लिजेंड्स क्रिकेट लीगचा दुसरा सीझन येत्या सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) क्रिकेटच्या मैदानात पुन्हा परतण्याच्या तयारीत आहे. हरभजन सिंग टीम इंडियाच्या (Team India) जर्सीत दिसणार नसला तरी लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसून येणार आहे. तसेच लिजेंड्स क्रिकेट लीगचा दुसरा सीझन येत्या सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे. (Harbhajan Singh to play in second edition of legends league cricket)

42 वर्षीय हरभजन सिंग व्यतिरिक्त भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), इरफान पठाण (Irfan Pathan), त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण (Yusuf Pathan), ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि विश्वचषक विजेता इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन यांचाही या लीगमध्ये समावेश असणार आहे.

लीगच्या दुसऱ्या सत्रात 4 संघ आणि 110 माजी क्रिकेटपटू खेळताना दिसून येणार आहेत. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या हरभजनने याबाबत सांगितले की, 'मैदानावर परतण्यासाठी मी उत्साही आहे.' दरम्यान, वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू लेंडल सिमन्स आणि दिनेश रामदिन हे देखील आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या यादीमध्ये दिसून येणार आहेत.

हरभजन सिंगने आपल्या कारकिर्दीत 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत तर त्याच्या नावावर कसोटीत 417, एकदिवसीय सामन्यात 269 आणि T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 25 विकेट देखील आहेत. हरभजनने कसोटीत 2 शतके आणि 9 अर्धशतकेही केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT