Harbhajan Singh And S Sreesanth Viral Video Dainik Gomantak
क्रीडा

Video: आयपीएलदरम्यान हरभजन-श्रीशांत पुन्हा भिडले, व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ!

Harbhajan Singh And S Sreesanth Viral Video: हरभजनने वेगवान गोलंदाज एस श्रीशांतला मैदानातच थप्पड मारली होती. सामना हरल्यानंतर रागाच्या भरात हरभजनने हे कृत्य केले होते.

Manish Jadhav

Harbhajan Singh And S Sreesanth Viral Video: आयपीएलची सुरुवात 2008 पासून झाली. मात्र, पहिल्याच हंगामात हरभजन सिंग आयपीएलच्या सर्वात मोठ्या वादाचा एक भाग बनला होता. हरभजनने वेगवान गोलंदाज एस श्रीशांतला मैदानातच थप्पड लगावली होती. सामना हरल्यानंतर रागाच्या भरात हरभजनने हे कृत्य केले होते.

दरम्यान, ही घटना कोणीही विसरलेले नाही. नुकतेच त्याने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून 14 वर्षांनंतर आपली चूक मान्य केली आहे. पण या सगळ्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोन्ही खेळाडू एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

आयपीएलमध्ये हरभजन-श्रीशांतमध्ये पुन्हा वाद झाला

हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि एस श्रीशांत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही खेळाडू लिफ्टमध्ये भांडताना दिसत आहेत. एका शब्दाच्या उच्चारावरुन दोघांमध्ये वादावादी सुरु झाली.

यादरम्यान लिफ्टमध्ये एक मुलगीही होती, जी या घटनेचा व्हिडिओ बनवत होती. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ एका जाहिरात शूटचा आहे, जो टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतनेही शेअर केला आहे.

हरभजन सिंगने आपली चूक मान्य केली

आयपीएल 2008 मध्ये हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा भाग होता आणि एस श्रीशांत किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता.

आयपीएलमधील या घटनेनंतर हरभजनवर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर त्याच्यावर पाच एकदिवसीय सामन्यांचीही बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी ग्लान्स लाईव्ह फेस्टमध्ये बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, 'जे झाले ते चुकीचे आहे.'

विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एस श्रीशांत भाग होता

एस श्रीशांत हा भारताच्या स्टार वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. 2007 आणि 2011 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता.

आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला. 27 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, त्याने भारतासाठी 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 169 विकेट्स घेतल्या आहेत. एस श्रीशांतनेही आयपीएलमध्ये 44 सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT