Hanuma Vihari Twitter/BCCI
क्रीडा

Irani Cup 2023: विहारीकडे 'या' भारतीय संघाचे नेतृत्व, सौरष्ट्रला देणार कडवे आव्हान

Hanuma Vihari: विहारी राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध नेतृत्व करताना दिसणार आहे.

Pranali Kodre

Hanuma Vihari Captain Rest of India for Irani Cup 2023 against Saurashtra:

एकिकडे भारतात वनडे वर्ल्डकपची धूम सुरू असतानाच इराणी कप खेळवण्यात येणार आहे. १ ऑक्टोबरपासून इराणी कपमधील सामन्याला राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.

इराणी कप स्पर्धेत प्रथम श्रेणी प्रकारातील एकच सामना खेळवला जातो. या सामन्यात त्या हंगामातील रणजी ट्रॉफी विजेता संघ आणि शेष भारतीय संघ (Rest of India) आमने-सामने असतात. दरम्यान यंदा १ ऑक्टोबरपासून सौराष्ट्र आणि शेष भारतीय संघात सामना खेळला जाणार आहे.

सौराष्ट्राने रणजी ट्रॉफी २०२३ स्पर्धा जिंकली आहे. या सामन्यासाठी शेष भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. शेष भारतीय संघाचे नेतृत्व हनुमा विहारीकडे सोपवण्यात आले आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली जुलैमध्ये दक्षिण विभागाने दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते.

त्याच्याबरोबर शेष भारतीय संघात मयंक अगरवाल, बी साई सुदर्शन, यश धूल, रोहन कुन्नुमल, सर्फराज खान हे फलंदाज आहेत. तसेच वेगवान गोलंदाज विद्वथ कावेराप्पा, नवदीप सैनी, सौरभ कुमार पुलकित नारंग या गोलंदाजांसह शम्स मुलानी हा अष्टपैलू खेळाडूही संघात आहे.

तसेच यष्टीरक्षक म्हणून केएस भरत आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. या संघात निवड होताना खेळाडूंची या हंगामातील कामिगीरीही लक्षात घेतली जाते.

दरम्यान, असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी या हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण अनेक खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धसाठी भारतीय संघात निवड झाल्याने ते इराणी ट्रॉफीसाठी उपलब्ध नाहीत.

दरम्यान, रणजी ट्रॉफी २०२३मध्ये ७९८ धावांसह प्रभावी कामगिरी करणाऱ्या अभिमन्यू इश्वरन या टायफायई झाल्याने संघात जागा देण्यात आली नाही, तर जलज सक्सेनाचाही इराणी कपसाठी समावेश करण्यात आलेला नाही.

  • असा आहे शेष भारतीय संघ - हनुमा विहारी (कर्णधार), केएस भरत, मयंक अगरवाल, यश धूल, शम्स मुलानी, साई सुदर्शन, सर्फराज खान, पुलकित नारंग, सौरभ कुमार, यश दयाल, नवदीप सैनी, विद्वथ कावेरप्पा, आकाश दीप, रोहन कुन्नुमल आणि ध्रुव जुरेल.

  • सौराष्ट्र संघ - जयदेव उनाडकट (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शेल्डन जॅक्सन, अर्पित वासवडा, हार्विक देसाई, धरमेंद्रसिंग जडेजा, प्रेरक मंकड, चिराग जानी, जय गोहिल, पार्थ भट, विश्वराज सिंह जडेजा, समर्थ व्यास, युवराज सिंग डुडिया, कुशांग पटेल, स्नेल पटेल, देवांग करमता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT