Hanuma Vihari Dainik Gomantak
क्रीडा

Hanuma Vihari: जिगर असावी तर अशी! हाताला फ्रॅक्चर असतानाही विहारीने केली फलंदाजी, Video Viral

Pranali Kodre

Hanuma Vihari: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा क्रिकेटपटू अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतात. कधीकधी संघाच्या हितासाठी मोठा निर्णयही घेतात. असाच एक निर्णय हनुमा विहारीने घेतला. तो हाताला फ्रॅक्चर झाल्यानंतरही मैदानात फलंदाजीसाठी उतरला होता, त्याने दाखवलेल्या या धैर्याबद्दल त्याचे सध्या कौतुक होत आहे.

भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये मध्यप्रदेश विरुद्ध आंध्रप्रदेश यांच्यात उपांत्यपूर्व सामना इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियवर होत आहे. या सामन्यादरम्यान आंध्रप्रदेश प्रथम फलंदाजीसाठी उतरले होते. यावेळी आंध्रप्रदेशचा कर्णधार हनुमा विहारी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.

मात्र, फलंदाजीदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला. त्याच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले. पण असे असतानाही तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्याने यावेळी एकाच हाताने फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात ५७ चेंडूत २७ धावांची खेळीही केली. या खेळीत त्याने ५ चौकार मारले.

विहारी आंध्रप्रदेशच्या पहिल्या डावात मनगटाला फ्रॅक्चर असतानाही फलंदाजी करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

या सामन्यात आंध्रप्रदेशने प्रथम फलंदाजी करताना १२७.१ षटकात सर्वबाद ३७९ धावा केल्या. आंध्रप्रदेशकडून रिकी भूई आणि करण शिंदे यांनी शतके केली. रिकी भूईने २४० चेंडूत १४९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 18 चौकार आणि १ षटकार मारला. तसेच करणने २६४ चेंडूत ११० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले.

मध्यप्रदेशकडून अनुभव अगरवालने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच कुमार कार्तिकेय आणि गौरव यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आवेश खान आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मध्यप्रदेशचा संघ पहिल्या डावात ६९.१ षटकात २२८ धावांवर सर्वबाद झाला. मध्यप्रदेशकडून शुभम शर्माने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त मध्यप्रदेशच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

आंध्रप्रदेशकडून पृथ्वी राजने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच केव्ही शशिकांतने ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर नितीश रेड्डी आणि ललित मोहन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT