Ranji Trophy 2023: स्नेहलने ठोकले नाबाद शतक, छत्तीसगडकडून गोव्याला फॉलोऑन

Snehal Kauthankar: रणजी करंडक क्रिकेट सामन्यात छत्तीसगडने गोव्यावर फॉलोऑन लादला, पण स्नेहलच्या झुंजार खेळीमुळे पिछाडीचे अंतर कमी झाले.
Snehal Kauthankar
Snehal KauthankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतकीय क्रिकेटमधील द वॉल स्नेहल कवठणकर (147) याने गुरुवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कारकिर्दीतील संस्मरणीय नाबाद शतक झळकाविले. रणजी करंडक क्रिकेट सामन्यात छत्तीसगडने गोव्यावर फॉलोऑन लादला, पण स्नेहलच्या झुंजार खेळीमुळे पिछाडीचे अंतर कमी झाले.

दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी छत्तीसगडच्या पहिल्या डावातील ९ बाद ५३१ घोषित धावांना उत्तर देताना गोव्याने (Goa) सर्वबाद ३५९ धावा केल्या. छत्तीसगडला (Chhattisgarh) पहिल्या डावात १७२ धावांची आघाडी मिळाली. दिवसभरातील चार षटकांच्या खेळात गोव्याने दुसऱ्या डावात बिनबाद ४ धावा केल्या. पुन्हा फलंदाजीस आलेला स्नेहल तीन, तर ईशान गडेकर एका धावेवर नाबाद आहे. ईशानने पहिल्या डावात ८० धावांची चमकदार खेळी केली.

Snehal Kauthankar
Ranji Trophy: गोव्याचा मोठा विजय; एक डाव, चार धावा राखून सेनादलाचा पराभव

स्नेहलचे सातवे शतक

स्नेहल १४७ धावांवर नाबाद राहिला. त्याने कारकिर्दीतील सातवे रणजी क्रिकेट शतक झळकावताना १९३ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार व एक षटकार मारला. त्याची खेळी निर्दोष ठरली. सलामीच्या ईशान गडेकरने सुयश प्रभुदेसाई (२२) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली,

नंतर ईशानने स्नेहलच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ईशानला लेगस्पिनर शुभम अगरवाल याने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. डावखुऱ्या फलंदाजाने १२७ चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार व एक षटकार मारला.

Snehal Kauthankar
Ranji Trophy: ऐकावं ते नवलंच! चक्क राखेमुळे थांबला सामना, आर अश्विनच्याही कमेंटने वेधले लक्ष

मध्यफळीतील फलंदाजांकडून निराशा

ईशान बाद झाल्यानंतर स्नेहलला इतर फलंदाजांना दमदार साथ दिली नाही. खेळपट्टीवर टिकून राहण्यास दीपराज गावकर, एकनाथ केरकर, कर्णधार दर्शन मिसाळ, मोहित रेडकर यांना अपयश आले. त्यामुळे गोव्याचा डाव ७ बाद २५६ असा गडगडला. नवव्या क्रमांकावरील अर्जुन तेंडुलकर (३२) याने स्नेहलसह चांगली भागीदारी केली.

डावखुऱ्या फलंदाजाच्या साथीत स्नेहलने शतक पूर्ण केले, तसेच गोव्याला त्रिशतकी मजल गाठून दिली. डावातील दुसऱ्या नव्या चेंडूवर वासुदेव बरेथ याने सलग चेंडूवर अर्जुन व लक्षय गर्ग यांना बाद केल्यानंतर शेवटचा गडी विजेश प्रभुदेसाई स्नेहलच्या साथीत चिवटपणे खेळला. त्यांनी शेवटच्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला साडेतीनशे धावा पार करता आल्या.

Snehal Kauthankar
Ranji Trophy : यंदाच्या रणजी मोसमातील गोव्याचा पहिला विजय; केरळवर 7 गड्यांनी मात

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड, पहिला डाव ः ९ बाद ५३१ घोषित

गोवा, पहिला डाव (१ बाद ५१ वरून) ः ९२.५ षटकांत सर्वबाद ३५९ (ईशान गडेकर ८०, सुयश प्रभुदेसाई २२, स्नेहल कवठणकर नाबाद १४७, दीपराज गावकर ३२, एकनाथ केरकर ६, दर्शन मिसाळ १७, मोहित रेडकर ४, अर्जुन तेंडुलकर ३२, लक्षय गर्ग ०, विजेश प्रभुदेसाई ४, अजय मंडल २-६९, रवी किरण ३-६६, वासुदेव बरेथ २-७७, शुभम अगरवाल ३-१११).

गोवा, दुसरा डाव ः ४ षटकांत बिनबाद ४.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com