India Men's Team Coaches List: कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्यात गुरुचे स्थान महत्त्वाचे असते. गुरुमुळे आयुष्याला एक वळण मिळते आणि म्हणूनच गुरुचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. खेळाडूंच्या आयुष्यातही गुरुची शिकवण मोठे योगदान देते.
एखाद्या खेळाडूला केवळ त्याचा खेळच नाही, तर त्याचे व्यक्तीमत्त्व घडवण्यातही गुरुचा हात असतो. दरम्यान शिक्षकदिना निमित्ताने आज आपण भारतीय पुरुष क्रिकेट संघालाही आत्तापर्यंत मिळालेल्या प्रमुख प्रशिक्षकांबद्दल जाणून घेऊ.
सध्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद राहुल द्रविडकडे आहे. तो भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा 24 वा प्रशिक्षक आहे. आत्तापर्यंत भारतीय संघाला केवळ भारतीय प्रशिक्षकांचेच नाही, तर परदेशी प्रशिक्षकांचेही मार्गदर्शन लाभले आहे.
दरम्यान, भारताला 1932 साली कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला असला, तरी बरीच वर्षे भारतीय संघाला विशेष असा प्रमुख प्रशिक्षक नव्हता. संघाचे मॅनेजरच बऱ्याचदा प्रशिक्षकाचे काम पाहायचे.
साल 1971 मध्ये केकी तारापोरे यांना मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यांनाच भारतीय संघाचे पहिले प्रशिक्षक मानले जाते. त्यांच्यानंतर हेमू अधिकारी यांनी त्यांची जागा घेतली. 1983 सालचा वर्ल्डकप भारतीय संघाने माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू पीआर मान सिंग मॅनेजर असताना जिंकला होता.
साल 1992 पासून दौऱ्यांसाठी मॅनेजर नेमण्याऐवजी प्रशिक्षक म्हणून करार करण्यात आले. त्यामुळे 90 च्या दशकात भारतीय संघाला अजित वाडेकर, मदन लाल, संदीप पाटील, अंशुमन गायकवाड, कपिल देव असे प्रशिक्षक मिळाले.
सन 2000 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडला. भारतीय संघाला जॉन राईट यांच्या रुपात पहिला परदेशी प्रशिक्षक मिळाला. त्यांनी जवळपास 5 वर्षी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्यानंतर ग्रेग चॅपेल, गॅरी कर्स्टर्न, डंकन फ्लेचर असे परदेशी खेळाडूही मिळाले.
1971: केकी तारापोरे
1971-1974 : हेमू अधिकारी
1975 : गुलाबराय रामचंद
1978 : दत्ता गायकवाड
1980 : 1981 : सलीम दुर्राणी
1982 : अशोक मंकड
1983 - 1987 : पीआर मान सिंग
1988 - 1989 आणि 2007 : चंदू बोर्डे
1990 - 1991 : बिशन सिंग बेदी
1991 - 1992 : अब्बास अली बेग
1992 - 1996 : अजित वाडेकर
1996 : संदीप पाटील
1996 - 1997 : मदन लाल
1997 - 1999 : अंशुमान गायकवाड
1999 - 2000 : कपिल देव
2000 - 2005 : जॉन राईट
2005 - 2007 : ग्रेग चॅपेल
2007, 2015 आणि 2017 - 2021 : रवी शास्त्री
2007 - 2008 : लालचंद राजपूत
2008 - 2011 : गॅरी कर्स्टर्न
2011 - 2015 : डंकन फ्लेचर
2016 : संजय बांगर
2016 - 2017 : अनिल कुंबळे
2021 पासून : राहुल द्रविड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.