Gulveer Singh Commonwealth Games 2026 Silver Medal Dainik Gomantak
क्रीडा

Gulveer Singh: सैन्यात भरती होण्यासाठी धावायचा, आज बनला देशाचा हिरो! गुलवीर सिंहने रचला इतिहास; 10,000 मीटर शर्यतीत जिंकलं 'सिल्व्हर' पदक

Gulveer Singh Commonwealth Games 2026 Silver Medal: कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय सेनेतील नायब सुभेदार गुलवीर सिंहने 28 जुलै रोजी पुरुषांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावून क्रीडा जगतात नवा इतिहास रचला.

Manish Jadhav

Gulveer Singh Commonwealth Games 2026 Silver Medal: स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय सेनेतील नायब सुभेदार गुलवीर सिंहने 28 जुलै रोजी पुरुषांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावून क्रीडा जगतात नवा इतिहास रचला. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात 10 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकणारा गुलवीर सिंह हा पहिलाच भारतीय ॲथलीट ठरला. 27 वर्षीय गुलवीरचा इथंपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला.

मूळचा उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील शिरसा गावचा रहिवासी असलेल्या गुलवीरने सुरुवातीला केवळ भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव सुरु केला होता. धावण्याच्या याच कौशल्याच्या जोरावर 2018 मध्ये भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित 'ग्रेनेडियर्स रेजिमेंट'मध्ये त्याला नोकरी मिळाली. सैन्यात दाखल झाल्यानंतरही त्याने धावण्याचा सराव सातत्याने सुरु ठेवला, ज्याच्या बळावर त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्याने देशाची मान अभिमानाने उंचावली.

भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी मिळवल्यानंतर गुलवीरने आपल्या क्रीडा कौशल्याला नवी धार दिली. 2022 च्या आशियाई खेळांमध्ये 10 हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर 2023च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 5 हजार मीटर शर्यतीत त्याने कांस्यपदक पटकावले, तर 2025 च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 5 हजार आणि 10 हजार मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालत आपल्या वर्चस्वाची पावती दिली.

सध्या भारतीय सेनेत नायब सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या गुलवीर सिंहच्या नावावर 10 हजार मीटर, 5 हजार मीटर, हाफ मॅरेथॉन आणि वन माईल (एक मैल) या चारही महत्त्वाच्या प्रकारांमध्ये राष्ट्रीय विक्रम (नॅशनल रेकॉर्ड) नोंदवलेले आहेत. विशेष म्हणजे, 2026 मध्येच त्याने हाफ मॅरेथॉन अवघ्या 59 मिनिटे 42 सेकंदात पूर्ण करुन एक तासापेक्षा कमी वेळेत ही शर्यत पार करणारा पहिला भारतीय ॲथलीट होण्याचा महाविक्रम रचला. याशिवाय, मे 2026 मध्ये अमेरिकेत आयोजित 'म्युझिक सिटी कार्निव्हल'मध्ये अवघ्या चार मिनिटांपेक्षा कमी वेळेत एक मैलाची शर्यत पूर्ण करणारा तो पहिला भारतीय बनला होता. ग्लासगोमधील या ऐतिहासिक रौप्य पदकाने त्याच्या दैदिप्यमान कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT