U-25 CK Nayudu Trophy Dainik Gomantak
क्रीडा

U-25 CK Nayudu Trophy: गोव्याचा पराभव, गुजरात डाव व 26 धावांच्या फरकाने विजयी

फॉलोऑननंतर कालच्या 8 बाद 197 वरून गोव्याचा दुसरा डाव बुधवारी सकाळी 213 धावांत आटोपला.

किशोर पेटकर

कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत गुजरातविरुद्ध गोव्याचा (Gujrat Vs Goa) पराभव निश्चित होता, त्यावर बुधवारी सकाळी 4.3 षटकांत शिक्कामोर्तब झाले.

(Gujrat Beat Goa In Under 25 CK Nayudu Trophy)

सांगे येथील जीसीए मैदानावर (GCA Ground Sanguem) गुजरातने सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी गोव्याला डाव व 26 धावांच्या फरकाने हरविले. त्यांचा हा सलग तिसरा डावाने विजय ठरला. त्यामुळे गटात सर्वाधिक 21 गुण झाले आहेत. गोव्याचा हा तीन सामनातील दुसरा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे तीन गुण कायम राहिले.

फॉलोऑननंतर कालच्या 8 बाद 197 वरून गोव्याचा दुसरा डाव बुधवारी सकाळी 213 धावांत आटोपला. गुजरातने पहिल्या डावात 369 धावा केल्यानंतर गोव्याचा डाव 130 धावांत आटोपला होता. त्यामुळे त्यांना 239 धावांनी पिछाडीवर राहावे लागले होते.

जयवीर सिंग याने योगेश कवठणकर (55) व शुभम तारी (0) यांना सलग चेंडूवर बाद करून गोव्याचा दुसरा डाव संपविला. समीत आर्यन मिश्रा 02 धावांवर नाबाद राहिला. गुजरातच्या जयवीर याने 29 धावांत 05 गडी बाद केले. त्याने पहिल्या डावातही निम्मा संघ गारद केला होता. त्याने सामन्यात 76 धावांच्या मोबदल्यात 10 विकेट मिळविल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

Rama Kankonkar: 'मोबाईलचा डेटा फॉरमॅट का केला'? हल्लाप्रकरणी रामा, जेनिटोंचे वकील भिडले; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबर कामत लहान कसे?

SCROLL FOR NEXT