Fire In Gujarat Titans Team Bus Dainik Gomantak
क्रीडा

Fire In Gujarat Titans Team Bus: फायनलनंतर मोठी दुर्घटना! गुजरातच्या बसला आग; शुभमन गिल, बटलरसह सर्व खेळाडू 1 तास रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं?

Gujarat Titans Bus Catch Fire After Final: आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून (RCB) ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून (RCB) ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवरून खेळाडू जेव्हा हॉटेलकडे परतत होते, तेव्हा त्यांच्या टीम बसला अचानक भीषण आग लागली. या धक्कादायक घटनेमुळे अहमदाबादच्या रस्त्यावर काही काळ खळबळ उडाली होती.

आग लागण्याचे मुख्य कारण काय?

प्राथमिक अहवालानुसार, बसमध्ये आग लागण्याचे मुख्य कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम सामना संपल्यानंतर ही बस खेळाडूंना घेऊन हॉटेलच्या दिशेने जात होती. याच अंतिम सामन्यात बेंगळुरूच्या संघाने गुजरात टायटन्सचा पराभव करून आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. पराभवाच्या दुःखात असलेल्या खेळाडूंसाठी हा बस अपघात अधिक मानसिक त्रास देणारा ठरला.

तासभर रस्त्याच्या कडेला थांबले खेळाडू

बसला आग लागताच गुजरात टायटन्सचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणेने अत्यंत वेगाने पावले उचलली. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणताही खेळाडू किंवा कर्मचारी जखमी झाला नाही आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे खेळाडूंना जवळपास एक तास रस्त्याच्या कडेलाच थांबून राहावे लागले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दुसरी व्यवस्था करून खेळाडूंना सुखरूप हॉटेलपर्यंत पोहोचवले.

गुजरात टायटन्ससाठी अतिशय थकवणारा आठवडा

गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसाठी आयपीएल २०२६ चे प्लेऑफ वेळापत्रक आधीच खूप थकवणारे राहिले होते. २९ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या क्वालिफायर-२ सामन्यापूर्वी, २७ मे रोजी संपूर्ण संघाला धरमशालेहून मुल्लानपूरला प्रवास करावा लागला होता. त्यातच मुल्लानपूरमधील खराब हवामानामुळे ३० मे रोजी अहमदाबादसाठीच्या त्यांच्या प्रवासाला उशीर झाला. शनिवार संध्याकाळी उशिरा संघ शहरात पोहोचल्यामुळे खेळाडूंना फायनल मॅचपूर्वी पुरेशी विश्रांती देखील मिळू शकली नव्हती.

क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांचे मोठे वक्तव्य

अंतिम सामन्यातील पराभव आणि खेळाडूंच्या थकव्याबाबत बोलताना गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी सांगितले की, "आरसीबीने अतिशय उत्तम खेळ केला आणि त्यांनी विजय मिळवला, हे आम्ही मान्य करतो. आम्ही गेल्या काही दिवसांत खूप प्रवास केला आणि जास्त सामने खेळल्यामुळे थकलो होतो, असे कारण सांगून मी आमच्या पराभवाचे समर्थन करणार नाही. हे आमच्या संघाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे."

ते पुढे म्हणाले की, "आमचा १५५ धावांचा स्कोअर अपेक्षेपेक्षा कमी होता हे खरे आहे, तरीही आमच्या संघाने हा स्कोअर वाचवण्यासाठी मैदानावर जीवाची बाजी लावली. आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण नक्कीच करू, पण कधीकधी विरोधी संघ आपल्यापेक्षा सरस खेळतो हे देखील आपल्याला खेळाडूवृत्तीने स्वीकारावे लागते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

गोव्यात 'शिवसेने'ची मोर्चेबांधणी; प्रत्येक मतदारसंघात शाखा, 30 जागांवर विजयाचे लक्ष्य

मराठी आणि गोव्याचे सीमारेखन

SCROLL FOR NEXT