Goa Cricket Player V.K Siddharth And Darshan Misal Dainik Gomantak
क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy 2023: सिद्धार्थ, दर्शनचे झुंजार प्रयत्न तोकडे; गुजरातची गोव्यावर 15 धावांनी मात

किशोर पेटकर

Syed Mushtaq Ali Trophy 2023: के. व्ही. सिद्धार्थ व कर्णधार दर्शन मिसाळ यांनी विजयासाठी २१७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी झुंजार प्रयत्न केले, पण अखेरीस ते तोकडे ठरले.

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या क गटात गुजरातने १५ धावांनी विजय मिळविल्यामुळे गोव्याला लागोपाठ दोन सामने जिंकल्यानंतर पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

झारखंडमधील रांची येथे झालेल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ७ बाद २१६ धावा केल्या, नंतर उत्तरादाखल गोव्याला ६ बाद २०१ धावांची मजल मारता आली.

ईशान गडेकर व राहुल त्रिपाठी यांनी ५.३ षटकांत ५४ धावांची आक्रमक सलामी दिल्यानंतर गोव्याची ३ बाद ६७ अशी घसरगुंडी उडाली.

मात्र नंतर सिद्धार्थने दीपराज गावकर याच्या चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून गोव्याला सावरले. नंतर सिद्धार्थने दर्शनसह पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला संधी प्राप्त झाली.

मात्र सिद्धार्थ बाद झाल्यानंतर, चेंडू व धावांचे अंतर कमी झाल्याने विजय हुकला. दर्शनने स्पर्धेत सलग दुसरे अर्धशतक नोंदविले.

संक्षिप्त धावफलक

गुजरात: २० षटकांत ७ बाद २१६ (ऊर्विल पटेल ४६, आर्य देसाई २५, उमंग कुमार २३, सौरव चौहान ३६, चिराग गांधी २६, रिपल पटेल २९, अर्जुन तेंडुलकर ४-०-५७-२, शुभम तारी ४-०-३२-१, लक्षय गर्ग ४-०-४५-२, मोहित रेडकर ४-०-४२-२, दीपराज गावकर ३-०-२३-०, विकास सिंग १-०-१५-०) वि

वि. गोवा : २० षटकांत ६ बाद २०१ (ईशान गडेकर ३२, राहुल त्रिपाठी २२, के. व्ही. सिद्धार्थ ५३- ३७ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, सुयश प्रभुदेसाई ८, दीपराज गावकर ३०, दर्शन मिसाळ नाबाद ५०- २० चेंडू, ३ चौकार, ५ षटकार, तुनीष सावकार ०, मोहित रेडकर नाबाद १, शेन पटेल ४-३६, रवी बिष्णोई १-२४, पियुष चावला १-३८).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT