Graham Thorpe
Graham Thorpe Dainik Gomantak
क्रीडा

अफगाणिस्तान संघाला मिळाला नवा प्रशिक्षक

दैनिक गोमन्तक

अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लंडच्या पराभवानंतर वगळण्यात आलेले माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांची अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या नवीन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1993 ते 2005 दरम्यान इंग्लिश संघाकडून शंभर कसोटी सामने खेळणाऱ्या थॉर्प यांना ऑस्ट्रेलियन संघाकडून अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) पराभव पत्करावा लागल्याने नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. थॉर्प अफगाणिस्तानचे (Afghanistan) प्रशिक्षक लान्स क्लुसेनर यांची जागा घेतील, जे दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर नोव्हेंबरमध्ये पायउतार झाले होते. (Graham Thorpe has been appointed coach of the Afghanistan team)

दरम्यान, ग्रॅहम थॉर्प यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लिश संघासाठी 100 कसोटी सामने खेळताना त्यांनी 179 डावांमध्ये 44.7 च्या सरासरीने 6744 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 16 शतके आणि 39 अर्धशतके आहेत. थॉर्प यांची कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) सर्वोत्तम फलंदाजी म्हणजे नाबाद 200 धावांची राहीली आहे.

तसेच, त्यांच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी इंग्लिश संघासाठी 82 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी 77 डावांमध्ये 37.2 च्या सरासरीने 2380 धावा केल्या आहेत. थॉर्प यांच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 21 अर्धशतके आहेत. तर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये थॉर्प यांची सर्वोत्तम फलंदाजी 89 धावांची आहे.

याशिवाय, त्यांच्या गोलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास तर, त्यांनी इंग्लिश संघासाठी कसोटीत सहा डावांत गोलंदाजी केली आहे. परंतु त्यांना म्हणावं तसं यश मिळावता आले नाही. एकदिवसीय क्रिकेटच्या पाच डावांत थॉर्प यांना दोन वेळा यश मिळाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT