इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL) (आयपीएल) 2021 च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मध्यातच मोठा बदल केला आहे. सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार असणाऱ्या डेव्हीड वॉर्नरला (Dewid Warner) हटवून संघाने केन विल्यमसनला (Ken Willamson) कर्णधारपदाची धुरा दिली आहे. हैदराबादच्या पुढच्या होणाऱ्या सगळ्या सामन्यामध्ये संघाचं नेतृत्व केन विल्यमसन करणार आहे. सनरायझर्स हैदराबादनं सोशल मिडियावरील ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. (IPL 2021 Sunrisers Hyderabad made a big change in the middle)
‘’उद्याच्या आणि आयपीएलच्या आगामी सामन्यांसाठी सनराझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन असणार आहे. उद्या राजस्थान रॉयल्सविरुध्दच्या सामन्यासाठी ओव्हरसीज कॉम्बिनेशनची जागा बदलण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. संघ व्यवस्थापन डेव्हीड वॉर्नरबद्दल पूर्ण आदर करते. आणि विशेष म्हणजे मागील आयपीएलच्या हंगामात वॉर्नरचा मोठा प्रभाव राहिला होता हे विसरता कामा नये. या हंगामातील उर्वरीत सामन्यांसाठी वॉर्नर संघाला आत आणि बाहेर पाठिंबा देत राहील,’’ असं हैदराबादने ट्विटद्वारे सांगितले आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाची कामगिरी अगदी सुमार राहीली आहे. हैदराबाद संघानं आत्तापर्यंत आयपीएलच्या या मोसमातील सहा सामने खेळले आहेत. पैकी हैदराबाद संघानं वॉर्नरच्या नेतृत्वाखाली केवळ एक सामना जिंकला आहे. पॉंईट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ सर्वात तळाशी आहे. संघामध्ये सामूहिक जबाबदारीचा अभाव असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
संघाचा कर्णधार म्हणून डेव्हीड वॉर्नरने काही सामन्यांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंचा समावेश करण्याचा प्रयोग केला मात्र त्याचा हा प्रयोग पुरता फसला. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने संघात बदल करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे डेव्हीड वॉर्नरने काही सामन्यांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली. मात्र मधल्या फळीतील आणि डेथ ओव्हर्समध्ये हैदराबादच्या फलंदाजाना सातत्याने अपयश येत गेलं. मागच्या वर्षी हैदराबाद संघ प्लेऑफपर्यंत गेला होता. मात्र या हंगामात संघ पूर्णपणे प्लॉप ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.