The Sports Authority Of Goa Dainik Gomantak
क्रीडा

गोव्यात राष्ट्रीय क्रीडा संहिता बंधनकारक : क्रीडामंत्री गावडे

जानेवारीपासून पूर्णपणे लागू, क्रीडा प्राधिकरणाच्या खजिनदापदी प्रज्योत चोडणकर

किशोर पेटकर

गोव्यात राष्ट्रीय क्रीडा संहिता 2011 लागू असून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून होईल. यासंबंधी निर्णय मंगळवारी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या आमसभेत झाला.

माशेल येथील देवकीकृष्ण स्पोर्टस क्लबचे प्रज्योत चोडणकर यांची गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. प्राधिकरणाच्या नव्या आमसभा आणि गव्हर्निंग काऊंसिलचा कालावधी तीन वर्षांसाठी असेल.

आमसभा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी आमसभेच्या सूचीपत्रिकेतील सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

आमसभेनंतर क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले, की ``गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होईल, त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा संहिता राज्यात पूर्णपणे लागू होईल. ज्या क्रीडा संघटनांच्या निवडणुका नियोजित आहेत, त्यांना राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार निवडणूक घ्यावी लागेल.

ज्या संघटनांच्या निवडणुका यापूर्वीच झालेल्या आहेत, त्या कार्यकारिणींना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर राजीनामा देऊन नव्याने घटनाबदलानुसार निवडणुकीस सामोरे जावे लागेल. त्यासाठी 1 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत असेल.``

राष्ट्रीय क्रीडा संहिताविषयक प्रश्न गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी क्रीडा प्राधिकरण आमसभेत उपस्थित केला. त्यावर चर्चा होऊन त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला.

आमसभेने मंजुरी दिलेले महत्त्वाचे प्रस्ताव

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडू व संघांना 3 टियर वातानुकुलिन प्रवास

कार्यक्रम विभागासाठी प्रकल्प अधिकारी व सहाय्यक प्रकल्प अधिकारीपदाची निर्मिती

गोवा क्रीडा प्राधिकरणाची मान्यता असलेल्या ऑलिंपिक खेळांसाठी सध्या प्रशिक्षक नसल्यास प्रत्येकी 2 प्रशिक्षक नियुक्ती

क्रीडा प्राधिकरणाचे व्यायामशाळा मार्गदर्शक महेश कवळेकर यांना वेटलिफ्टिंग प्रशिक्षकपदासाठी मंजुरी

12 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या मागील आमसभेच्या इतिवृत्तास मंजुरी

वैधानिक लेखापरीक्षकाची 2022-23 ते 2024-25 कालावधीसाठी नियुक्ती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT