Google Doodle Google
क्रीडा

Google डूडलसह ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 ची शानदार सुरुवात

Google Doodleने ही साजरा केला ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022

दैनिक गोमन्तक

आज गुगलने (Google) महिला क्रिकेट विश्वचषक 2022 च्या सुरुवातीचे डूडल बनवले आहे. या डूडलमधून गुगलने महिला क्रिकेट टिमता आदर करत प्रोत्साहन दिले आहे. महिला क्रिकेट विश्वचषक 2022 न्यूझीलंडमधील बे ओव्हल स्टेडियमवर सुरू होणार आहे. महिला क्रिकेट विश्वचषकाच्या 12व्या आवृत्तीला आज सकाळी 6.30 वाजता सुरुवात झाली. यजमान संघ या स्पर्धेतील पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत आहे. (Google Celebrates Beginning of ICC Women’s Cricket World Cup 2022 with special Doodle)

आजच्या डूडलमध्ये Google ने सहा महिला क्रिकेटपटू मैदानात खेळताना दाखवल्या आहेत. तुम्ही Google च्या डूडलवर क्लिक केल्यास तुमच्या स्क्रीनवर क्रिकेटचे चेंडू डावीकडून उजवीकडे सरकताना दिसतील. त्यांना पुन्हा पाहण्यासाठी, तुम्ही खालील बटणावर क्लिक करू शकता. जगातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 1844 साली कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यात खेळला गेला होता. पहिली महिला विश्वचषक स्पर्धा 1973 साली आयोजित करण्यात आली होती, जी इंग्लंडने जिंकली होती.

महिला क्रिकेट विश्वचषक 2022 मध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. न्यूझीलंड यजमान असण्याच्या आधारावर पात्र ठरले, तर ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी 2017 ते 2021 दरम्यान झालेल्या महिला चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या पाच संघांमध्ये स्थान मिळवले आहे. आणि इतर तीन संघ आयसीसीने ठरवले होते.

या स्पर्धेत एकूण 31 सामने होणार आहेत. असून सहा ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ड्युनेडिनमधील युनिव्हर्सिटी ओव्हल, ऑकलंडमधील ईडन पार्क, क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल, माउंट मौनगानुईमधील बे ओव्हल, हॅमिल्टनमधील सेडॉन पार्क आणि वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह. या सहा स्टेडियमवर हे सामने रंगणार आहेत. उपांत्य सामना वेलिंग्टन येथे खेळला जाईल, तर क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT