Xavier Dsouza  Dainik Gomantak
क्रीडा

Xavier Dsouza wins Bronz: राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याच्या झेवियर डिसोझाला ब्राँझपदक

स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी मिळवले पदक

किशोर पेटकर

Goa's Swimmer Xavier Dsouza wins Bronz in National game: गोव्याचा आघाडीचा पुरुष जलतरणपटू झेवियर डिसोझा याने सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम साधला. हैदराबाद येथे सुरू असलेल्या 76व्या स्पर्धेत त्याने मंगळवारी ब्राँझपदकाची कमाई केली.

स्पर्धेत झेवियरला 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत पदक थोडक्यात हुकले होते, त्या शर्यतीत त्याला चौथा क्रमांक मिळाला होता. मंगळवारी स्पर्धेतील वैयक्तिक शेवटच्या शर्यतीत 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये त्याने 26.80 सेकंद वेळ नोंदविताना तिसरा क्रमांक पटकावला.

सेनादलाच्या पी. एस. मधू याने 26.60 सेकंद वेळेसह सुवर्ण, तर कर्नाटकाच्या बेनेडिक्टन रोहित याने 26.77 सेकंद वेळेसह रौप्यपदक पटकावले. 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या पात्रता फेरीत सकाळच्या सत्रात झेवियरने 27.25 सेकंद वेळ नोंदविली, नंतर मुख्य फेरीत कामगिरी आणखी वेगवान करताना त्याने ब्राँझपदकावर हक्क सांगितला.

यावेळच्या राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत गोव्याचे हे दुसरे पदक ठरले. झेवियरप्रमाणे सोमवारी श्रुंगी बांदेकर हिने महिला गटात 200 मीटर मेडली शर्यतीत तिसरा क्रमांकाचे पदक जिंकले होते.

पदकांची मालिका कायम

बंगळूर येथे रे सेंटर जलतरण संकुलात भूषण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या झेवियर डिसोझाने सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत पदक जिंकले. 2021मध्ये बंगळूर येथे झालेल्या स्पर्धेत त्याने दोन ब्राँझपदके, तर 2022 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अंत्यविधीच्या ठिकाणी 'ऑर्केस्ट्रा'! एका बाजूला चिता जळतेय, दुसऱ्या बाजूला गाण्यांवर डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Ind A vs SA A: सलामीवीर ढेपाळले, मधल्या फळीनेही हात टेकले, आफ्रिकेने टीम इंडियाला 73 धावांनी चारली पराभवाची धूळ; क्लीन स्वीपचे स्वप्न भंगले! VIDEO

Konkan Railway: कोकण रेल्वेतील मोठी कारवाई! नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त; 'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT