सीनियर महिला आणि 19 वर्षांखालील ज्युनियर मुलांच्या संभाव्य संघाचे शिबिर सोमवारपासून सुरू होत आहे. Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या महिला, ज्युनियर क्रिकेट संघ बांधणीस प्राधान्य

जीसीएच्या 19 वर्षांखालील (under 19) संघासाठी कर्नाटकचे माजी रणजीपटू राजेश कामत यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गोव्याचे माजी रणजीपटू राहुल केणी त्यांचे सहाय्यक असतील, तर निनाद पावसकर ट्रेनर आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) (BCCI) आगामी देशांतर्गत क्रिकेट (Cricket) मोसमासाठी संघ बांधणीस प्राधान्य देताना गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) (जीसीए) प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार सीनियर महिला (Senior woman's) आणि 19 वर्षांखालील (under 19) ज्युनियर मुलांच्या संभाव्य संघाचे शिबिर सोमवारपासून (ता. 19) सुरू होईल.

जीसीएच्या 19 वर्षांखालील संघासाठी कर्नाटकचे माजी रणजीपटू राजेश कामत यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गोव्याचे माजी रणजीपटू राहुल केणी त्यांचे सहाय्यक असतील, तर निनाद पावसकर ट्रेनर आहेत. सीनियर महिला क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी अनंत तांबवेकर यांची नियुक्ती झाली असून अनुराधा रेडकर संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक आहेत.

जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी शुक्रवारी सांगितले, की ``19 वर्षांखालील मुलांच्या गटात 27, तर सीनियर महिला गटात 29 संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दोन्ही गटातील खेळाडूंचे तंदुरुस्ती, तसेच नेट शिबिर पर्वरी येथील जीसीए अकादमी संकुलात सोमवारपासून सुरू होईल. निवडलेल्या सर्व खेळाडूंना कोविड लस घेण्यास सांगितली आहे, तसेच शिबिरापूर्वी खेळाडूंना चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक असेल. खेळाडूंची, तसेच प्रशिक्षण विभागातील साऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी शनिवारी पर्वरी येथील जीसीए संकुलात होईल.``

19 वर्षांखालील निवड समितीचे निमंत्रक अब्दुल माजिद, समितीचे अध्यक्ष रोहित अस्नोडकर, सदस्य अब्रार खान, सॅबी फर्नांडिस यांनी संभाव्य खेळाडूंची निवड केली. सीनियर महिला क्रिकेट संघ निवड निमंत्रक संगीता माझरेकर, अध्यक्ष डेझी फर्नांडिस, सदस्य लिझेट वाझ व कृत्तिका नाईक यांनी केली. ज्युनियर मुलगे व सीनियर महिलांच्या सराव शिबिरासाठी जीसीएचे प्रशिक्षण व क्रिकेट ऑपरेशन्स संचालक प्रकाश मयेकर समन्वयक असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

6 वर्षांच्या रमाने 50 सेकंदात पूर्ण केले 8 श्लोक; गोव्याची चिमुकली बनली 'ग्रँडमास्टर'! 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव

Vijay Hazare Trophy: मुंबईचा विजयी चौकार; गोवा संघाचा 87 धावांनी पराभव, अभिनव तेजराणाची शतकी खेळी व्यर्थ

'कुशावती' सुशासनाची तहान भागवेल? - संपादकीय

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

Goa Live News: तांबडी सुर्ला येथे तरुणाईचा 'सूर्यनमस्कार'ने नूतन वर्षारंभ

SCROLL FOR NEXT