Bhakti Kulkarni Dainik Gomantak
क्रीडा

Arjuna Award To Bhakti Kulkarni: गोमंतकीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा; बुद्धिबळपटू 'भक्ती'ला अर्जुन पुरस्कार प्रदान

'अर्जुन'वर नाव कोरणारी तिसरी गोमंतकीय

दैनिक गोमन्तक

Arjuna Award: गोव्याची इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू, ऐतिहासिक बुद्धिबळ ऑलिंपियाड ब्राँझपदक विजेती भक्ती कुलकर्णीला प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. 6 नोव्हेंबर रोजी पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. आज हा पुरस्कार भक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तीला प्रदान करण्यात आला.

(Goan chess player Bhakti Kulkarni was awarded the Arjuna Award by the President )

निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने 2022 सालच्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे, त्यात महिला बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, पुरुष बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद यांचा समावेश होता. यातील भक्तीला आज सन्मानित करण्यात आले.

एकूण 25 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी, तर सर्वोच्च ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याची शिफारस करण्यात आली आहे. केंद्राने सरकारने शिफारसींना मान्यता दिल्यानंतर या पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले.

'अर्जुन'वर नाव कोरणारी तिसरी गोमंतकीय

मडगाव येथील 30 वर्षीय भक्ती ‘अर्जुन’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील हा सन्मान प्राप्त करणारी तिसरी गोमंतकीय ठरली आहे. यापूर्वी गोलरक्षक ब्रह्मानंद शंखवाळकर (1997) व आघाडीपटू ब्रुनो कुतिन्हो (2001) या गोमंतकीय फुटबॉलपटूंनाच हा प्रतिष्ठित मिळालेला आहे. यानंतर आता भक्तीने वीस वर्षांनंतर गोव्याला हा सन्मान मिळवून दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT